मनोज जरांगे स्पष्टचं म्हणाले, हा मराठा समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न
-आपला फोकस आरक्षणावर ठेवा
प्रतिनिधी
रायगड : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यातील सभा महाड येथे झाली. या सभेत बोलताना त्यांनी राजकीय स्वार्थासाठी दोन समाजात झुंज लावण्याचा प्रयत्न काही जण करत आहेत. आपली जात वाचवा, अशी मराठा समाजाला माझी हाक आहे. आपला फोकस आरक्षणावर ठेवायचा. मराठा समाजाने संयम ठेवावा असे आवाहन केले. तर, एकच माणूस मराठा आरक्षणला विरोध करतात. म्हातारे माणसे आहेत. कायद्याच्या पदावर बसलेले जातीय दंगली घडवण्यासाठी प्रयत्न करत आहे. आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे गनिमी कावे खेळायचे असा इशाराही दिला.
मराठा समाज आरक्षणासाठी खूप दिवसापासून लढतो आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी समिती काम करायला लागली आहे. मराठा समाजाला शंभर टक्के आरक्षण मिळणार. प्रत्येक गावात शहरात मराठी आरक्षणाचे पुरावे सापडू लागले आहेत. आरक्षण कोण अडवते त्याचे आधी नाव सांगा. नंतर, आरक्षण आठ दिवसानंतर मिळाला तरी चालेल असे जरांगे पाटील म्हणाले.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मी लढत आहे. मला श्रेय नको. पण, मराठा मुलांच्या ओठावर मला हसू बघायचे आहे. आमचे पोर मार्क असूनही घरी बसतात. मराठा समाजाच्या पोराच्या तोंडावर आरक्षण मिळाल्याचे हास्य मला बघायचं आहे. आपण 70 टक्के लढाई जिंकत आलो आहोत. चारी बाजूंनी मराठ्यांना घेरलं आहे. आरक्षण असलेले आणि नसलेले सर्व मराठे सावध व्हा असे आवाहन त्यांनी मराठा कार्यकर्त्यांना केले.


