भाजपाच्या गडात काँग्रेसची मुसंडी, चिंचवडमध्ये अश्वीनी जगताप विजयाच्या दिशेने
-विवेक पाटील यांची रिपोर्ट
पुणे : पुण्यातील कसबापेठ विधानसभा मतदार संघामध्ये भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडमध्ये भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे या दोन्ही ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीला सुरूवात झाली. सकाळी अकरा वाजेपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
-अपडेट
कसबा मतदारसंघ
उमेदवाराचे नावमतेरवींद्र धंगेकर (मविआ)45,638 (आघाडीवर)हेमंत रासने (भाजप)40,761
चिंचवड मतदारसंघ
उमेदवाराचे नावमतेअश्विनी जगताप (भाजप)35,935 (आघाडीवर)नाना काटे (मविआ)28421राहुल कलाटे (अपक्ष)11428
कसबा, पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुक भाजपने प्रतिष्ठेची करुन ठेवली. त्यामुळे यातील एक जरी जागा महाविकास आघाडीला मिळाली तर हा भाजपसाठी मोठा धक्का असेल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी दिली आहे. तर जयंत पाटलांनी प्रचारात भाजपविरोधी वातावरण दिसल्याने महाविकास आघाडीच्या विजयाचा दावा केला.
लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे निकालाकडे बघताना फारसा उत्साह वाटत नसल्याची प्रतिक्रीया अश्विनी जगताप यांनी माध्यमांशी बोलताना दिली. पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी आज मतमोजणीच्या दिवशी भावनिक प्रतिक्रीया दिली आहे.
आठव्या फेरीत रवींद्र धंगेकर 30527 मतांनी आघाडीवर आहेत. हेमंत रासने यांना 27187 मते मिळाली आहेत. तर, चिचंवडमध्ये अश्विनी जगताप यांनी 4 हजार मतांनी आघाडी मिळवली आहे.
सातव्या फेरीत रविंद्र धंगेकर एकूण 25904 मतांसह आघाडीवर आहेत. भाजपचे हेमंत रासने यांना 24633 मते मिळाली आहेत.
कसबा व चिंचवड पोटनिवडणुकीत मतमोजमीच्या सहा फेऱ्या पार पडल्या आहेत. कसब्यात मविआचे रविंद्र धंगेकर हे जवळपास 3 हजार मतांनी आघाडीवर आहेत. तर, चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप यांनीही 3 हजार मतांनी आघाडी मिळवली आहे.
कसबा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अभिजीत बिचुकले यांना केवळ 4 मते मिळाली आहेत.
तिसऱ्या फेरीत कसब्यात मविआचे रवींद्र धंगेकर आघाडीवर आहेत. तर, चिंचवडमध्ये अश्विनी जगताप यांनी आघाडी कायम ठेवली आहे.
चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप आणि काँग्रेसचे नाना काटे यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. अश्विनी जगताप सध्या केवळ 500 मतांनी आघाडीवर आहेत.
कसबा मतदारसंघात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे 3 हजार मतांनी आघाडीवर आहेत. तर, भाजपचे हेमंत रासने पिछाडीवर आहेत.
चिंचवड पोटनिवडणुकीत पोस्टल मतमोजणीमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप आघाडीवर आहेत. मविआचे नाना काटे व अपक्ष उमेदवार राहुल कलाटे पिछाडीवर आहेत.
कसबा पोटनिवडणुकीत पोस्टल मतमोजणीमध्ये काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आघाडीवर आहेत. भाजपचे हेमंत रासने पिछाडीवर आहेत.
कसबा पोटनिवडणुकीची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील भारतीय खाद्य निगम गोदामात होत आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुणे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच शहरातील मध्यभागात कडक बंदोबस्त तैनात केला आहे. निकालानंतर विजयी उमेदवारांना विजयी मिरवणूक काढण्यास देखील पोलिसांनी मनाई केली आहे.


