बाळासाहेबांच्या शिवसेनेची नागपुरातील या नेत्यांनी केली पाठराखण

बाळासाहेबांच्या शिवसेनेची नागपुरातील या नेत्यांनी केली पाठराखण

-दर्शन घेण्यात गैर काहीच नाही

प्रतिनिधी
नागपूर : चार महिन्यांनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील मंत्र्यांनी आसामधील कामाख्या देवीच्या मंदिरात जाऊन पूजा केली व देवीचा नवस फेडला. यावरून विरोधकांनी टीकास्त्र सोडलेले असताना राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिंदेची पाठराखण केली आहे.

रविवारी नागपुरात बोलताना मुनगंटीवार यांनी देवीच न्याय करीत असते. आजवर काय काय झाले हे आपण पाहिलेच आहे. दर्शन घेण्यात गैर काहीच नाही असे सांगितले. या पुढेही आपण पाहूच. जो जैसा करेगा वैसा भरेगा…उद्धव ठाकरे अयोध्येच्या राम मंदिरात गेले तर ते चालते. मात्र शिंदे गट कामाख्या देवीच्या मंदिरात गेले तर ते दुसऱ्या राज्याचे मंदिर झाले असं कसं म्हणता येईल असा सवाल मुनगंटीवार यांनी केला.

-छत्रपतींबद्दल मनात आदर

राज्यपाल महोदयांनी त्यांच्या वक्तव्याचा खुलासा केला आहे. त्यामुळे पुन्हा पुन्हा प्रतिक्रिया देणे मला योग्य वाटत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल माझ्या मनात अपार आदर आहे. माझ्या त्या भाष्याचे कोणी चुकीचे अर्थ काढू नये, असे राज्यपालांनी स्पष्टपणे सांगितले आहे. एवढे स्पष्ट बोलल्यानंतर पुन्हा पुन्हा त्यावर प्रतिक्रिया देणे योग्य नाही. आकाशात सूर्य, चंद्र आहे तोपर्यत छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार प्रेरणादायी असणार आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीची भावना आहे.

-अल्टिमेटम देणे प्रत्येकाचा अधिकार

अल्टीमेटम कोणताही राजकीय पक्ष देऊ शकतो. राजकारणात अल्टिमेटम देणे प्रत्येकाचा अधिकार आहे असे संजय राऊत यांच्या वक्तव्यावर सांगितले. महाराष्ट्राला तिरुपतीमध्ये तसेच तिरूपतीच्या ट्रस्टमध्ये जागा मिळाली आहे. उद्धव ठाकरेंचे सचिव मिलिंद नार्वेकर त्या ट्रस्टमध्ये आहे. महाराष्ट्राला दिल्लीत महाराष्ट्र सदनच्या स्वरूपात जागा मिळाली आहे. आपण जागा मागितली तर कुठल्याही राज्यात आपल्याला जागा मिळेल. मात्र जागा मागितलीच नसेल तर त्या राज्यामध्ये राज्य कशी मिळेल. मुंबई आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे इतर सर्व राज्य इथे जागा मागतात. प्रत्येक राज्यात महाराष्ट्र सदन बांधायची यामुळे गरज पडत नाही. कारण महाराष्ट्र प्रगत राज्य आहे. महाराष्ट्रातील लोकांना इतर राज्यात तेवढे काम पडत नाही. मात्र प्रत्येक राज्याला महाराष्ट्रात काम पडतेच.

-सर्व जुने व्हिडिओ काढू

जुने ऑडिओ ऐकवून जनाची नाही तर मनाची लाज ठेवायची असेल, तर शरद पवारांपासून उद्धव ठाकरेपर्यंत सर्वांचे जुने व्हिडिओ काढू. सर्वपक्षीय जनाची नाही तर मनाची लाज ठेवावी, असा सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून कार्यक्रम ठेवू. तुम्हीच बांधावर जाऊन सांगितलं होते की पन्नास हजारांची मदत देऊ. कुठे गेली ती मदत. तुम्ही सांगितले होते, आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत कधी संबंध ठेवणार नाही. तुमचाच व्हिडिओ आहे. मग कोणी जनाची नाही तर मनाची ठेवावी.