बाप रे! शिवसेनेच्या ढाण्या वाघाने हा दिला थेट इशारा, माझ्यावर बोललं तर…
– जिल्हा पोलीस अधीक्षकांना पत्र देऊ
प्रतिनिधी
मुंबई : उद्धव ठाकरे यांचे जळगाव जिल्ह्यात स्वागत आहे. मात्र त्यांच्या सभेत संजय राऊत जर माझ्यावर बोलले तर मी थेट त्यांच्या सभेत घुसेल, असा इशारा शिवसेना नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला आहे.
उद्धव ठाकरे व संजय राऊत हे 23 एप्रिलला जळगावात येत आहेत. माजी आमदार आर. ओ. तात्या पाटील यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत येत आहेत. पुतळ्याच्या अनावरणानंतर शहरातील एम.एम. महाविद्यालयाच्या मैदानावर उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. मात्र या सभेपूर्वीच वातावरण तापलेले दिसत आहे.
–काय म्हणाले, गुलाबराव पाटील ?
उद्धव ठाकरे व संजय राऊत यांच्या या जळगाव दौऱ्यापूर्वीच गुलाबराव पाटील संतापले आहेत. गुलाबराव पाटील म्हणाले, माझे मित्र आर. ओ. पाटील यांचे माझ्यावर फार उपकार होते. त्यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी उद्धव ठाकरे येत आहेत. आर. ओ. पाटील आणि उद्धव ठाकरे यांचे पहिल्यापासून संबंध होते. त्या प्रेमापोटी उद्धव ठाकरे येत आहेत.


