नागपुरात भाजपाच्या या नेत्याचा मोठा दावा, ठाकरेंना केवळ दोन जागा

नागपुरात भाजपाच्या या नेत्याचा मोठा दावा, ठाकरेंना केवळ दोन जागा

-शिवसेनेला आहे त्या जागेवर मानावे लागेल समाधान

गजानन ढाकुलकर
नागपूर : उद्धव ठाकरे गटाला लोकसभा निवडणुकीत 2 जागा मिळणार असून त्यावरच त्यांना समाधान माणून घ्यावे लागणार आहे. त्यांच्या जागांवर काँग्रेसकडून दावा सांगितला जाणार आहे असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे पुढे बोलताना म्हणाले की, शिवसेनेला केवळ भाजपने मोठे भाऊ म्हणून स्थान दिले होते. आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये त्यांना जे मिळेल त्यात समाधान मानावे लागणार असा टोला लगावला आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, खरे तर कल्याणमध्ये स्थानिक प्रश्न आहे. त्यावरून वाद निर्माण झाला आहे. मी स्वत: त्यामध्ये लक्ष घालणार असून रवींद्र चव्हाण यांच्याशी बोलणार आहे. यातून मार्ग निघेल असे ते म्हणाले. मी बैठक घेऊन तोडगा काढणार आहे. केंद्रीय संसदीय मंडळाला उमेदवार निवडीचा अधिकार आहे.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीशिवाय पर्याय नाही. त्यांना दिल्या तेवढ्या जागांवर समाधान मानून घ्यावे लागेल. उद्धव ठाकरेंच्या जागांवर काँग्रेस दावा करणार आहे. त्यांना दोन जागांवर समाधान मानावे लागेल. उद्धव ठाकरे यांना भाजपानेच मोठ्या भावाचा दर्जा दिला. आता त्यांना काँग्रेस व राष्ट्रवादीचे चुपचाप ऐकून घ्यावे लागेल अशी टीका बावनकुळे यांनी केली.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मविआचे सरकार असते तर राष्ट्रवादीचे 100 आणि शिवसेनेचे 20 आमदार निवडून आणण्याचा प्लॅन तयार होता. सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्री करायचे होते. आणि शिवसेनेच्या 50 आमदारांना पराभूत करण्याची योजना होती. म्हणून एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात 50 आमदार बाहेर पडले.