एकच धुमाकूळ: दादांचे पुण्यात मुख्यमंत्रीपदाचे बॅनर
-पुन्हा दादा चर्चेस्थानी, भाजपाच्या गोटात प्रचंड अस्वस्थता
प्रतिनिधी
पुणे :राज्याच्या राजकारणात सध्या एकच नाव धूमाकुळ घालत आहे. ते म्हणजे अजित पवार. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. या चर्चांना खुद्द अजित पवार यांनी जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे सांगत पूर्णविराम दिला. मात्र आता पुण्यात लागलेल्या ‘जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’ या बॅनरबाजीवरुन वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
अजित पवार यांनी शुक्रवारी पुण्यात झालेल्या प्रकट मुलाखतीत ‘मी आजही मुख्यमंत्रिपदाचा दावा करू शकतो’ असे स्पष्टपणे सांगत प्रथमच आपली महत्त्वाकांक्षा जाहीरपणे व्यक्त केली. ‘जिवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादीतच राहणार’ असे दोन दिवसांपूर्वी ठासून सांगणाऱ्या अजितदादांनी आता मात्र “भविष्यात आपण सत्तेसाठी काँग्रेस, उद्धव सेनेप्रमाणेच भाजपसोबतही जाऊ शकतो. पण मुख्यमंत्रिपदाबाबत आता तडजोड करणार नाही,’ असे स्पष्ट संकेत दिले आहेत.
आपल्याला मुख्यमंत्री व्हायला आवडेल असे वक्तव्य अजित पवारांनी काल केले होते. त्यानंतरच अजितदादा हेच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचे बॅनर्स पुण्यात झळकले आहेत. पुण्यातील कोथरूडमध्ये हे बॅनर्स झळकल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू अजित पवार असे या बॅनरवर छापण्यात आले असून दिपाली संतोष डोख यांनी हे बॅनर्स लावले आहेत.
पुण्यात आयोजित मुलाखतीत अजित पवार म्हणाले, राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपदाचे आकर्षण नाही. मुख्यमंत्रिपदावर मात्र आम्ही 2024 मध्येच काय, आजही दावा करू शकतो. आधी आपण ‘सेक्युलर’बाबत बोलत होतो. पण 2019 मध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी सगळ्यांना फाटा देत सरकार आणले. तेव्हा काही मुद्दे बाजूला ठेवले होते. भाजपशी युतीसाठी दबाव नसल्याचे दादा म्हणाले. पण संधी आल्यास सेक्युलरिझमचा अडसर ठरणार नाही, असे संकेत त्यांनी दिले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘फायरब्रँड’ नेते अजित पवार यांनी शुक्रवारी पुण्यात झालेल्या प्रकट मुलाखतीत ‘मी आजही मुख्यमंत्रिपदाचा दावा करू शकतो’ असे स्पष्टपणे सांगत प्रथमच आपली महत्त्वाकांक्षा जाहीरपणे व्यक्त केली. ‘जिवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादीतच राहणार’ असे दोन दिवसांपूर्वी ठासून सांगणाऱ्या अजितदादांनी आता मात्र “भविष्यात आपण सत्तेसाठी काँग्रेस, उद्धव सेनेप्रमाणेच भाजपसोबतही जाऊ शकतो. पण मुख्यमंत्रिपदाबाबत आता तडजोड करणार नाही,’ असे स्पष्ट संकेत दिले आहेत.