उद्धव ठाकरेंविषयी आदर पण…अजितदादा फटकळ…?

उद्धव ठाकरेंविषयी आदर पण…अजितदादा फटकळ…?

-शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर नववर्षाला म्हणाले

प्रतिनिधी
शिर्डी : नव्या वर्षाच्या सुरुवातीलाचा शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांच्याकडून विरोधी पक्षनेते अजित पवार यांच तोंडभरुन कौतुक करण्यात आलय. नवीन वर्षाच्या सुरुवातीला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शिर्डीत जाऊन साईबाबांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी विविध मुद्दयांवर भाष्य केले. उद्धव ठाकरेंविषयी आदर असल्याचेही दिपक केसरकर म्हणाले.

दीपक केसरकर म्हणाले, अजित दादा काहीही बोलले तरी त्यांचे मन मात्र निर्मळ आहे. याची मला खात्री आहे. मी अजित पवार यांच्याबरोबर काम केलेले आहे. बोलताना फटकऴ बोलतील पण एक विरोधी पक्ष नेता कसा असावा याचं ते उत्तम उदाहरण आहेत. जसा आम्हाला मुख्यमंत्र्याचा अभिमान आहे. तसा आम्हाला अजित पवारांचा देखील अभिमान आहे, दीपक केसरकर असेही म्हणाले.

आदर करणारा मनुष्य

दीपक केसरकर उद्धव ठाकरेंविषयी बोलताना म्हणाले, कटुता कमी करणे हे उद्धव ठाकरे यांच्या हातात आहे. मी त्यांचा आदर करणारा मनुष्य आहे. उद्धव ठाकरे भेटले तेव्हा मी त्यांना काहीच उत्तर दिलेले नव्हते. जेव्हा घर पेटतं तेव्हा अगोदर आग विजवावी लागते. असे मी त्यांना सांगितले. पण त्यांनी ऐकले नाही. मात्र टीव्हीवर जे दाखवण्यात आले त्याचे दुख वाटले.

आत्मपरिक्षण उद्धव ठाकरेंनी करावे

दीपक केसरकर पुढे म्हणाले, पैशाने प्रेम विकत घेता येत नाही. शिंदेंनी आमदारांची मने जिंकली. त्यामुळे आम्ही सर्व त्यांच्यासोबत गेलो. अस काय घडलं की, आम्ही त्यांच्याबरोबर गेलो याचे उत्तर आम्ही वेळ आल्यावर देऊ. ते काय घडल याच आत्मपरिक्षण उद्धव ठाकरेंनी करावे. असा सल्लाही दीपक केसरकर यांनी शिवसेनेला आणि ठाकरेंना दिला.