आणखी धक्का! केंद्राचा मोठा प्रकल्प महाराष्ट्राऐवजी मध्य प्रदेशात

आणखी धक्का! केंद्राचा मोठा प्रकल्प महाराष्ट्राऐवजी मध्य प्रदेशात

-शिंदे सरकार मेजवानीत व्यस्त

प्रतिनिधी
मुंबई: राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला आणखी एक धक्का बसला आहे. महाराष्ट्रातून प्रकल्प बाहेर जाण्याचे क्रम काही केल्या थांबत नाही. ऊर्जा आणि अक्षय उर्जेसाठी आवश्यक असणाऱ्या उपकरणांच्या निर्मितीचे उत्पादन युनिट राज्यात आणण्यासाठी शिंदे सरकारने केलेले प्रकल्प तोकडे पडले. हा प्रकल्प आपल्याकडे खेचण्यासाठी महाराष्ट्रासह अनेक राज्यांचे प्रयत्न सुरू होते. त्यात मध्य प्रदेशने बाजी मारली.

आत्मनिर्भर मध्य प्रदेशसाठी आम्ही सातत्यानं प्रयत्नशील आहोत. राज्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. आत्मनिर्भर भारतासाठी आम्ही योगदान देत आहोत, असं ट्वविट मध्य प्रदेश सरकारच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून करण्यात आलं आहे.

–केंद्रीय उर्जा मंत्रालयाची योजना

मध्यप्रदेश प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय उर्जा मंत्रालयाची योजना असलेल्या युनिटला आपल्याकडे खेचण्यासाठी आंध्र प्रदेश, बिहार, गुजरात, महाराष्ट्र, ओदिशा, तमिळनाडू आणि तेलंगणाचे प्रयत्न सुरू होते. मंत्रालयाने युनिटच्या उभारणीसाठी ४०० कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देऊ केले आहे.

राज्यांकडून देण्यात आलेल्या प्रस्तावांचे मूल्यांकन प्रकल्प व्यवस्थापन संस्थेकडून करण्यात आले. मध्य प्रदेश औद्योगिक विकास महामंडळाचा प्रस्ताव सर्वोत्तम असल्याचा निष्कर्ष प्रकल्प व्यवस्थापन संस्थेने काढला. त्यामुळे एकूण आठ प्रस्तावांमधून मध्य प्रदेशचा प्रस्ताव स्वीकारण्यात आला.

-शिंदे सरकारचे प्रयत्न अपुरे

उर्जा आणि अक्षय ऊर्जेच्या निर्मितीसाठी गरजेची उपकरणं तयार करणारे युनिट उभारण्याची परवानगी मध्य प्रदेशला मिळाली आहे. या युनिटसाठी शिंदे सरकारने केलेले प्रयत्न अपुरे ठरले. त्यामुळे आणखी एक चांगला प्रकल्प महाराष्ट्राला गमवावा लागला आहे.

-यापूर्वी मेडिकल डिव्हाईस पार्क गमावले

याआधी मेडिकल डिव्हाईस पार्कचा प्रकल्प राज्याने गमावला. हिमाचल प्रदेश, तमिळनाडू, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशने बाजी मारली. त्यांनी केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ उचलत प्रकल्प मिळवला. या सर्व राज्यांना केंद्राने प्रकल्पासाठीच्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी प्रत्येकी ४०० कोटी रुपयांचा निधी दिला.