आज नागपुरात धडकणार लाल वादळ; का म्हणतात या पक्षाला लाल वादळ

आज नागपुरात धडकणार लाल वादळ; का म्हणतात या पक्षाला लाल वादळ

-राष्ट्रीय अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांची सभा

प्रतिनिधी

नागपूर : भारत राष्ट्र समितीचा देशपातळीवर विस्तार होत आहे. पक्षाचे महाराष्ट्रातही सर्व शक्तिनिशी कार्य सुरू आहे. विदर्भात सर्वदूर पक्ष विस्तार करण्यासाठी नागपूर येथे भारत राष्ट्र समितीच्या महाराष्ट्रातल्या पहिल्या पक्ष कार्यालयाचे उद्घाटन आज, गुरुवारी (15 जून) रोजी होत आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री तथा भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांच्या हस्ते हे उद्घाटन होईल. यानिमित्त कार्यकर्ता मेळावा व विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.

चंद्रशेखर राव यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने नागपूर शहरात ठिकठिकाणी “अब की बार किसान सरकार”चा नारा गुंजू लागला आहे. दरम्यान, चेन्नूर विधानसभेचे आमदार बलका सुमन यांनी कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला.

15 जून 2023 रोजी दुपारी 1 वाजता मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे नागपूर विमानतळ येथे आगमन व स्वागत होईल. त्यानंतर दुपारी 1.15 वाजता भारत राष्ट्र समिती पक्ष कार्यालयाचे उद्घाटन प्लॉट नंबर 14, रामकृष्ण नगर, साई मंदिराजवळ, वर्धा रोड येथे होईल. दुपारी 2 वाजता कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशिमबाग येथे कार्यकर्ता मेळावा होणार आहे.

के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत विदर्भातील माजी खासदार, माजी आमदार व राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्ते ‘बीआरएस’मध्ये प्रवेश करणार आहेत. त्यानंतर के. चंद्रशेखर राव संबोधित करतील. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भारत राष्ट्र समितीचे पूर्व विदर्भ समन्वयक ज्ञानेश वाकुडकर यांनी केले आहे.