असे काय झाले? 67 वर्षांत बुडाला एलआयसीचा पैसा
– संजय राऊत यांचा आरोप
प्रतिनिधी
मुंबई : 67 वर्षांत एलआयसीचा एका रुपयाही बुडाला नाही. मात्र, मोदी सरकारच्या काळात गेल्या 7 वर्षांत एलआयसीचे 50 हजार कोटींचे नुकसान झाले, अशी टीका आज ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला.
आज पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, केंद्र सरकारच्या निर्लज्जपणामुळे एलआयसीचे नुकसान होत आहे. आजपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात विरोधक यावर आक्रमक होणार आहेत. याबाबत आज विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक होत असून यात जो निर्णय होईल, तो शिवसेनेला मान्य असेल.
-अदानींचा हा तर महाघोटाळा
संजय राऊत म्हणाले, अदानींचा घोटाळा म्हणजे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात झालेला महाघोटाळा आहे. याविरोधात संसदेत आम्ही विरोधक पूर्ण ताकदीने सरकारला घेरणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बात करण्याऐवजी यावर भूमिका स्पष्ट केली पाहीजे.
दुसरीकडे, कसबा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांची उमेदवारी जवळपास निश्चित केली आहे. तर, चिंचवडची जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढणार, असा निर्णय मविआने घेतल्याचे ट्विट महाराष्ट्र काँग्रेसने केले आहे. मात्र, चिंचवडबाबत आज निर्णय व्हायला पाहिजे, असे म्हणत संजय राऊत यांनी अजूनही ठाकरे गटाने चिंचवडच्या जागेच आग्रह सोडला नसल्याचे स्पष्ट केले. संजय राऊत म्हणाले, आज प्रमुख मविआ नेत्यांची बैठक होईल. तेव्हा चिंचवडच्या जागेबाबत निर्णय होईल.
नाणारचा प्रकल्प करू नका, असा भराडी देवीचाच कौल आहे. तो कौल टाळून काही कराल तर देवीचा कोप होईल व तुमचे राज्य गुवाहाटीच्या रेड्यांप्रमाणे बळी जाईल, असा टोला शिवसेनेने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.


