खळबळजनक वक्तव्य : हा या पक्षाचा हत्या, नरसंहाराचा प्रयत्न

खळबळजनक वक्तव्य : हा या पक्षाचा हत्या, नरसंहाराचा प्रयत्न

-प्रकाश आंबेडकर स्पष्ट बोलले

प्रतिनिधी
पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपासह सर्व विरोधी पक्षाकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. प्रचाराची रणनीती आखण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाकडून राजकीय पावले टाकली जात आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, निवडणुकीच्या तोंडावर देशातील मुस्लीम, दलित आणि आदिवासी बहुजनांचा नरसंहार आणि हत्या करण्यास भाजपा-आरएसएस मागेपुढे पाहणार नाहीत, असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.

-काय म्हणाले प्रकाश आंबेडकर ट्विटरवर 

”प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटर खात्यावर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हणाले, “जातीय द्वेष आणि त्यातून हत्या घडवून आणण्याचा भाजपा- आरएसएसचा इतिहास पाहता हाच त्यांचा निवडणुका जिंकण्याचा पारंपरिक अजेंडा असल्याचे दिसते. आता पुन्हा निवडणुका तोंडावर असताना गुजरात दंगलींप्रमाणे- भारतातील लोकशाहीची आणि देशातील मुस्लीम, दलित आणि आदिवासी बहुजनांचा नरसंहार आणि हत्या करण्यास ते (भाजपा-आरएसएस) मागेपुढे पाहणार नाहीत, अशी शक्यता वाटते.”

त्यामुळेच अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिराच्या उद्घाटनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी भाविकांना झेड प्लस सुरक्षा प्रदान करावी. तसेच राम मंदिराच्या सुरक्षेची जबाबदारी एनएसजीकडे सोपवावी, अशी गांभीर्यपूर्वक मागणी मी करत आहे, असेही प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरवर पोस्ट करुन म्हटले.