यह डर अच्छा है : तब्बल सात मिनिटे या नेत्याविरुद्ध भाजपाचा बडा नेता बोलला

यह डर अच्छा है : तब्बल सात मिनिटे या नेत्याविरुद्ध भाजपाचा बडा नेता बोलला

-खासदार संजय राऊत यांचे ट्विट

प्रतिनिधी
नांदेड : शनिवारी नांदेडमध्ये गृहमंत्री अमित शहा यांची सभा झाली. सभेत अमित शहांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाना साधला. याला ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी ट्विटद्वारे प्रत्युत्तर दिले. संजय राऊत म्हणाले की, गृहमंत्री अमित शहा यांचे नांदेड येथील हे भाषण सर्वांनी निवांत ऐका, अतिशय मजेशीर आहे. राऊत म्हणतात की, मला प्रश्न पडला आहे की, हे भाजपा चे महासंपर्क अभियान होते की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वर टीका करण्याचे खास आयोजन होते.

अमित भाई यांच्या भाषणातील एकूण वीस मिनिटांतील तब्बल 7 मिनिटे उद्धव ठाकरे यांच्यावर होती. म्हणजे अजून ही ‘मातोश्री’ चा धसका कायम आहे. शिवसेना फोडली, नाव आणि धनुष्य बाण गद्दार गटास लबाडी करून दिले. तरी देखील डोक्यात ठाकरे आणि शिवसेनेचे भय कायम आहे. म्हणूनच ‘ये डर अच्छा है’ . जे प्रश्न त्यांनी उध्दव ठाकरे यांना विचारले त्यावर खरे तर भाजपने त्यावर चिंतन करायला हवे. पण ते स्वतःच निर्माण केलेल्या जाळ्यात स्वतःच अडकले.