नातीसाठी या नेत्याने काढला वेळ: थेट गाठले सायकलचे दुकान

-नातीचा बालहट्ट केला पूर्ण

प्रतिनिधी
नागपूर : नेहमी बैठकांमध्ये व्यस्त असणारे केंद्रीय मंत्री दुकानात खरेदीसाठी करण्यासाठी बाहेर पडले. ही खरेदी स्वत:साठी नव्हती. एका छोट्या परीसाठी ही खरेदी होती. तिला काय हवे? तर सायकल. मग कोणाला सांगण्यापेक्षा किंवा आदेश देण्यापेक्षा केंद्रीय मंत्री स्वत: दुकानात गेले. नेहमी कामचुकार अधिकाऱ्यांना फैलावर घेणारे हे मंत्री खरेदीपर्यंत शांत बसून होते. ती छोटी परी ही नाही ती सायकल हवी, असा हट्ट करत होती. अखेर केंद्रीय मंत्र्यांनी तिचा बालहट्ट पूर्ण केला. या प्रकारामुळे दुकानदारासह इतरांनी आश्चर्य वाटले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपुरात खरेदी करण्यासाठी दुकानात गेले. देश विदेशात त्यांचे सतत भ्रमण सुरू असते. दिल्ली – मुंबई- नागपुरात सभा, बैठकांमध्ये ते सतत व्यस्त असतात. सतत कार्यकर्ते, अधिकारी आणि सर्वसामान्य माणसांच्या गराड्यात राहणारा हा लोकनेत्याने कुटुंबासाठी वेळ काढला. हा वेळ त्यांनी आपल्या नातीसाठी काढला. आताच नाही तर नेहमी तिच्यासाठी ते वेळ देत असतात. कधी आईसक्रीम खायला घेऊन जातात, तर कधी खेळणी घेण्यासाठी जातात.