राज्याबाहेरील या नेत्याचा आरोप: महाराष्ट्र बलवान तरीही पाणी नाही
-तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा आरोप
प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : ‘‘देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाले. पण आठ दिवसांना पाणी येते. छत्रपती संभाजीनगर असो की, अकोला हिच स्थिती आहे. राज्यात अनेक नद्यांचा उगम होतो. महाराष्ट्र एक बलवान राज्य, मुंबई देशाची आर्थिक राजधानी असतानाही शहरांना, जनतेला पाणी देऊ शकत नाही का? जनता सोन्याच्या विटा मागत नाही, तर फक्त पाणी मागतेय तरीही देऊ शकत नाही, असा घणाघात भारत राष्ट्र समिती (बीआरएस) चे अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर उर्फ के. चंद्रशेखर राव यांनी केला.
के. चंद्रशेखर राव यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये जबिंदा मैदानावर सभा सुरू आहे. त्यावेळी ते बोलत होते. बीआरएस पक्षाचे प्रमुख आणि तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत आज पक्षप्रवेश झाला असून यानिमित्ताने ते शक्तिप्रदर्शन करून ताकदही दाखवण्याचा प्रयत्न केला.
केसीआर म्हणाले, एक प्रश्न देशातील बुद्धीजीवी आणि माझ्या मनात सतावत आहे. भारत एक महान परंपरेचा देश आहे. पण देशाचे लक्ष्य काय आहे? भारत आपले लक्ष्य गमावून तर नाही बसला ना? हा प्रश्न मला सातत्याने पडत आहे. एक गोष्ट समजणे आवश्यक आहे की, मी जे काही सांगणार ते तुम्ही ऐकूुन येथेच विसरून घरी जावू नका. आपल्या शहरात, गावांत जाल तेव्हा माझ्या वक्तव्यांचा विचार करा, लोकांना सांगा, चर्चा करा.
केसीआर म्हणाले, देशात काय होत आहे? काही लक्ष्याने पुढे जायचे की, जागीच खितपत पडायचे. ७५ वर्षे झाले देशाला स्वातंत्र्य मिळाले. शहरांमध्ये आठ दिवसांना पाणी येते. छत्रपती संभाजीनगर असो की, अकोला हिच स्थिती आहे. राज्यात अनेक नद्यांचा उगम होतो. महाराष्ट्र एक बलवान राज्य, मुंबई देशाची आर्थिक राजधानी असतानाही शहरांना, जनतेला पाणी देऊ शकत नाही का?
केसीआर म्हणाले, जनता फक्त पाणी मागतेय सोन्याच्या विटा मागत नाही तरीही देऊ शकत नाही. या गोष्टी बदलायला हव्या की, नाही? चांद तारे थोडेच मागतेय? पाणीच मागतेय ना..एवढी भाषणे राज्यात केली जातात पण पाणी मिळत नाही, असा भारत आपल्यला हवा आहे का?
केसीआर म्हणाले, उद्योगधंदे बंद पडत आहेत. लाखो श्रमजीवी रस्त्यावर येत आहेत. देशात जातीवाद, धर्मवाद, लिंगभेद होत आहे. धनवान श्रीमंतच होत आहे तर गरीब गरीबच होत चालला आहे. हे कटू सत्य आहे. मी काही गोष्टी सांगत नाहीये. कुणी माना अथवा मानू नका ते कटू सत्यच आहे. या गोष्टींवर उपचार व्हायला हवे. आजाराला सुधारणारे डाॅक्टर असतात, समाजाला सुधारण्यासाठी बुद्धीजीवी असतात. मी तरुणांना विचारतो की, आमचे वय होत आहे पण तुम्ही असेच खितपत राहणार का? की, उज्ज्वल रस्ता तयार करणार?
केसीआर म्हणाले, आपल्या संकटांचा आपल्यालाच निपटारा करावा लागणार. परकीय राष्ट्र आपल्या मदतीला येणार नाही. जेवढा उशीर आपण करू तेवढा अन्यायाचा सामना आपल्याला करावा लागेल.
केसीआर म्हणाले, देशात लोकशाही असेल तर तेरा महिने दिल्लीत आंदोलन करण्याची वेळ शेतकऱ्यांवर का येते? साडे सातशे शेतकऱ्यांचा आंदोलनावेळी मृत्यू झाला. हा देशात काय तमाशा होत आहे. पंतप्रधान माफी मागतात, शेतकरीविरोधी कायदा मागे घेतात पुढे तेरा महिने उलटतात पण काहीच होत नाही. याचा अर्थ काय तर काही तरी ‘दाल मे काला है’ मी हे एका ठिकाणी म्हटले तेव्हा लोक म्हणाले की, ‘अब तो दाल ही काली है’ अर्थात आपल्याला परिवर्तनाची गरज आहे.
केसीआर म्हणाले, आपण परिवर्तन करणार नाही तोपर्यंत आपले नशीब फळणार नाही. परिवर्तन केवळ राजकीय उलथापालथीची नाही तर उच्चगुणवत्तेचे परिवर्तन व्हावे. जनता जे सरकार मागेल ते सत्तेवर येणे हे परिवर्तन आहे. अनेक सरकार आले आणि गेले पण समस्यांचे सूत्रन झाले नाही. केसीआर म्हणाले, महाराष्ट्रात रोज सहा ते सात शेतकरी आत्महत्या करतात. पंतप्रधान किंवा राज्यातील नेत्यांना काहीच देणे घेणे नाही. ते लोक वाघ आणून आपल्याला दाखवत आहेत.
केसीआर यांच्या सभेची पूर्वतयारी झाली असून शहरात सर्वत्र पोस्टर्स, पताका, गुलाबी ध्वज फडकत आहेत. शहर गुलाबी रंगात रंगले असून शहरभरात होर्डिंग्स, बॅनर्स आणि झेंडे लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या सगळ्यात तेलंगणा राज्याची छाप दिसून येत आहे


