सुषमा अंधारेंविरुद्ध अवार्च्य टीका, या नेत्याची पोलीस ठाण्यात तक्रार
-पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष
प्रतिनिधी
संभाजीनगर: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याविरुद्ध अवार्च्य भाषेत टीका
केल्याप्रकरणी आमदार संजय शिरसाठ यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा, अशा तक्रारीचे पत्र विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजी नगर पोलीस ठाण्यात दिले आहे.
२६ मार्च रोजी आमदार संजय शिरसाठ यांनी त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत
उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याविरुद्ध अत्यंत अवार्च्य भाषेत टीका केली असल्याचे माध्यमातून समोर आले. त्यामुळे शिरसाठ यांच्या विरोधात भा.दं. वि. च्या कलम ३५४(अ)अनव्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार दानवे यांनी लेखी स्वरूपात केली आहे.


