पुन्हा स्वतंत्र विदर्भासाठी संविधान चौकात एल्लगार
-अधिवेशनात प्रश्नावर चर्चाच नाही
गजानन ढाकुलकर
नागपूर : नागपुरात नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात विदर्भातील प्रश्नावर चर्चाच झाली नाही. तसेच राज्य सरकारकडून विदर्भातील जनतेच्या तोंडाला पाने पुसण्यात आली, असा आरोप करत विदर्भवाद्यांनी शनिवारी (7 जानेवारी) संविधान चौकात आंदोलन केले.
यावेळी बोलताना विदर्भवादी मुकेश मासुरकर म्हणाले की, “कोरोनामुळे दोन वर्षांनंतर नागपुरात अधिवेशन झाले. यावेळी विदर्भातील अनेक मुद्द्यांवर चर्चा होणे अपेक्षित होते. मात्र राज्य सरकारकडून विदर्भावर अन्याय करण्यात आला आहे. राज्यात सरकार कोणाचेही असो मात्र विदर्भातील जनतेच्या प्रश्नांबाबत कोणालाही गांभीर्य नसल्याचे अनेकवेळा दिसून आले आहे.” याचा प्रतिकात्मक निषेध म्हणून ‘पश्चिम महाराष्ट्राच्या वाट्याला थाळीभर न्याय व विदर्भातील प्रश्नांचा भळी विचार’ या विषयाला घेऊन विदर्भवाद्यांनी लोकनायक बापूजी अणे स्मारक समितीच्या नेतृत्वात संविधान चौकात ‘थाळी फळी’ आंदोलन केले.


