नवी नांदी: प्रकाश आंबेडकर, उद्धव ठाकरे एकाच मंचावर
-देशात सध्या अराजकता असल्याचे मंथन
प्रतिनिधी
मुंबई : संजय राऊत यांच्यासारख्या शिवसेनेच्या मोठ्या नेत्याला शंभर दिवस तुरुंगात ठेवणे हे एकप्रकारे अराजकताच आहे. देशात सध्या अराजकता असून ही अराजकता दुर करण्यासाठी देशातील सर्व नेत्यांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे मत माजी मंत्री आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी आज केले.
प्रबोधनकार डाॅट काॅम या वेबसाईटचा लोकार्पण सोहळा आज दादर येथील शिवाजी मंदिर नाट्यगृहात पार पडला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची उपस्थिती होती. प्रबोधनकारांवर व त्यांच्या विचारांवर पी.एचडी. करणाऱ्या संशोधकांचा सत्कार करण्यात आला.
–देशाला गुलामीचा इतिहास
प्रकाश आंबेडकर म्हणाले, मनुस्मृती असे विष आहे की, ते प्यायल्यानंतर बळी माणसांचा तर जातो पण देशाचाही जातो. यातून आपण जेवढे बाहेर पडू त्यातून लवकर आपण बाहेर पडू. देशाला गुलामीचा इतिहास आहे. गुलामीचा एकाच वर्गाची आहे. उरलेले त्यात भरडले आहे.
-नव्याने काही उभे करा
राजेशाही ही संकल्पना क्षत्रियांची होती. त्यांची लढण्याची संकल्पना होती. एकदा क्षत्रिय हरला की, उरलेले सर्व हरले. उरलेल्यांना शस्त्र घेण्याचा अधिकार नव्हता. याला अपवाद फक्त शिवाजी महाराजांचा होता. तो अपवाद बघत- बघत मी असे म्हणेल की, आम्ही मनुच्या कायद्यात अडकून पडणार आहोत की, नव्याने काही उभे करणार आहोत.
–विधेवेचे एकीकडे मुंडण, दुसरीकडे पुर्नविवाह
प्रकाश आंबेडकर म्हणाले, हिंदु हा शब्द आपण मानत आलो. यात दोन विचारसरणी आहेत असे मी मानतो. एक वैदिक परंपरा तर दुसरी संतांची परंपरा. त्यांचे वर्णन करताना विधेवेचे एकीकडे मुंडण तर दुसरीकडे पुर्नविवाह आहे. आपल्याला नेमकी कोणती पाहीजे. प्रबोधनकारांनी वैदीक परंपरेवर आसूड ओढले आहेत. भवितव्याचा विचार करायचा असेल तर हा धर्म सार्वजनिक कसा होईल याची त्यांनी मांडणी केली.
-धर्म हा आवश्यक आहे
प्रकाश आंबेडकर म्हणाले, महात्मा गांधी, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंनी कधीही धर्म नाकारलेला नाही. धर्म हा आवश्यक आहे हे त्यांनी मानले परंतु, धर्माच्या अधिन राहुन काही करता येणार का तर नाही. या तिघांचे धर्माशी भांडण नव्हते तर सामाजिक व्यवस्थेच्या भांडणाचे होते. सामाजिक व्यवस्थेत सुधारणा काय हव्या हे त्यांनी मांडले. सणांना त्यांनी सार्वत्रिक करण्याचा प्रयत्न केला.
-दडपशाहीचे वातावरण देशात वाढले
प्रकाश आंबेडकर म्हणाले, आपण त्यांच्यामागे उभे का राहीलो नाही? कारण आपण समता आणि बंधुभावाचा बळी दिला. एका बाजूला दडपशाहीचे वातावरण देशात वाढले आहे. वैदीक धर्मातही हुकुमशाही आहे. देशात हुकुमशाही, हिटलरशाही वाढतेय हे आपण बोलतो. त्या – त्या व्यवस्थेतील राज्यकर्त्यांच्या पक्षात ही गोष्ट इनबिल्ट आहे. जो वारीला जातो त्यात मात्र अशी दडपशाही नाही.


