फुले पगडी बांधल्यानंतर,  राहुल का म्हणाले, यह महाराष्ट्र का सन्मान है

  • फुले पगडी बांधल्यानंतर,  राहुल का म्हणाले, यह महाराष्ट्र का सन्मान है

-हिंगोलीत घेतला चहा, केली चाय पे चर्चा

प्रतिनिधी

हिंगोली : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी हिंगोलीत सोमवारी (ता. 14) गुरुकृपा हॉटेलचे चालक बाबुराव हराळे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. तत्पूर्वी भारत जोडो यात्रेदरम्यान अर्धापूर नांदेड येथे कॉंग्रेसच्या ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी फुले पगडी देवुन राहुल गांधींचा सन्मान केला. यानंतर गांधी यांनी सिर पर ये सिर्फ ‘फेंटा’ नहीं है…सम्मान है महाराष्ट्र का, और इस सम्मान को मैं सदा सिर-आंखों पर रखूंगा…कभी झुकने नहीं दूंगा… असे व्टीट करुन त्या सत्काराला दाद दिली.

फुले – शाहू- आंबेडकर देश जागता

सेलचे प्रदेशाध्यक्ष माळी यांच्या सत्कारानंतर राहुल गांधींनी फुले – शाहू- आंबेडकर यांचे विचारच देशाला वाचवू शकतात असे उद्गार काढले. माळी यांनी ओबीसींची जातनिहाय जनगणना व कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन या दोन प्रमुख मागण्या त्यांच्यापुढे मांडल्या. त्यावर गांधी यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद देत येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या मेनीफेस्टोमध्ये या दोन प्रमुख मागण्यांचा समावेश करण्यात येईल असे आश्वासन दिले.

बहुत दिन के बाद चाय पिया

राहुल गांधींनी हिंगोलीत आज चहा घेतला. ”बहु दिनसे कितनी बढीया चाय नही मिली, आज चाय पिके बहुत अच्छा लगा.” असे म्हणत त्यांनी हाॅटेलचालकाची स्तुती करीत त्यांना धन्यवादही दिले.

-विद्यार्थिनीची संवाद

यावेळी त्यांनी विधिज्ञांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच ऋतुजा गडदे या विद्यार्थिनीची संवाद साधला. उच्च शिक्षण घेऊन काय व्हावे वाटेल असा प्रश्न त्यांनी ऋतुजाला विचारला. यावेळी तिने क्षणाचाही ही विलंब न लावता मोठा अधिकारी व्हायचे आहे, असे सांगितले. राजकारणात यायचे नाही का? असा प्रश्न विचारून खासदार राहुल गांधी यांनी तिची फिरकी घेतली. त्यानंतर याच ठिकाणी असलेल्या हॉटेल गुरुकृपा येथे येऊन पुन्हा चहाचा आस्वाद घेतला.

खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा हिंगोली शहरात दाखल झाल्यानंतर ठिकठिकाणी स्वागत झाले. त्यानंतर शहरातील पार्वती टॉवर्स येथे त्यांनी अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी अ‌ॅड. सुरेश गडदे यांच्याशी संवाद साधला. यावेळी ऍड. मनीषा गडदे , ऍड. विपीन अर्धापुरकर, अ‌ॅड. कवडे , अ‌ॅड. सचिन पोले, अ‌ॅड. दीपक लेकुळे, अ‌ॅड. कानबाराव मस्के, अ‌ॅड. बालाजी जगताप, गुनाराव पोले, कानिफनाथ दिंडे , कृष्णा डीजीटलचे गंगाधर लोंढे, संतोष लोंढे बाबुराव हराळे आदींची उपस्थिती होती.