नुकसान पाहणीवरून शिंदे गटाच्या नेत्याची विखारी टीका
-स्वत:चा बाण सांभाळता आला नाही ते बांध काय सांभाळतील.
प्रतिनिधी
मुंबई : राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरेंवर विखारी टीका केली.
ज्यांना बांध समजत नाही ते बांधाबद्द्ल काय बोलणार, ठाकरेंना स्वत:चा बाण सांभाळता आला नाही ते बांध काय सांभाळतील.
घरामध्ये बसून चॉकलेट खाणे किंवा संगणकावर बसणे वेगळे असते, तर शेताच्या बांधावर जात पाहणी करणे वेगळे आहे. उद्धव ठाकरेंनी अडीच तासांच्या दौऱ्यात 24 मिनिटे पाहणी केली आता महाराष्ट्रातील नुकसानीची पाहणी अवघ्या 24 मिनिटांमध्ये हाईल का असा सवाल अब्दुल सत्तार यांनी उपस्थित केला आहे. आदित्य ठाकरेंनी त्यांच्या वडीलांना बाण, बांध यावर विचारणा करावी, असा खोचक टोला सत्तारांनी ठाकरेंना लगावला.
-ओला दुष्काळासाठी उपोषण
2020 च्या खरीप हंगामातील पीक विम्याची उर्वरित रक्कम 331 कोटी तसेच 2021 चे 388 कोटी विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे, सप्टेंबर महिन्यातील नुकसानभरपाई अनुदान 248 कोटी व जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी आमदार कैलास पाटील यांनी सोमवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या गटातील नेते आणि शिंदे गटातील नेत्यांमध्ये मोठा वाद निर्माण होताना दिसत आहे.
-आदित्य ठाकरेंनी ऐकली शेतकऱ्यांची गाऱ्हाणी
उद्धव ठाकरेंनी औरंगाबाद जिल्ह्यात नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली होती. आता आदित्य ठाकरेंनीही पाहणी दौरा सुरू करत शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेत आहे. काल त्यांनी कृषीमंत्री सत्तार यांच्यावर टीका केली होती. आता यावरून दोन्ही गटातील नेते आमने- सामने पाहायला मिळत आहे.


