उपमुख्यमंत्री गंभीर; हरभरा खरेदीची नोंदणी ऑफलाइन

उपमुख्यमंत्री गंभीर; हरभरा खरेदीची नोंदणी ऑफलाइन
-शेतकऱ्यांना मोठा दिलासा

प्रतिनिधी
मुंबई : अखेर हरभरा खरेदीची नोंदणी ऑनलाइनसोबत ऑफलाइन करायलाही शिंदे सरकराने परवानगी दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

अमरावतीमध्ये आज सकाळी हरभरा नोंदणीसाठी शेतकऱ्यांची तोबा गर्दी झाली. त्यामुळे ही नोंदणी रद्द करावी लागली. त्यानंतर शेतकरी आक्रमक झाले. हे पाहता सरकारने हा निर्णय घेतला. सध्या राज्यात नाफेडकडून हरभरा खरेदी सुरू आहे. 27 फेब्रुवारीपासून ही सुरुवात करण्यात आली. सध्या नाफेडकडून हरभऱ्याला क्विंटलमागे 5300 रुपये भाव मिळतो आहे, तर खासगी व्यापारी 4500 रुपये भाव देत आहेत. त्यामुळे नाफेडचा जास्त भाव पाहून अमरावतीतल्या धामणगाव रेल्वे हरभरा नोंदणीसाठी शेतकरी मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत.

रेल्वे‎ ‘नाफेड’मार्फत हरभरा (चणा)‎ खरेदीसाठी सोमवारी सकाळी आठपासून‎ नोंदणी सुरू झाली. त्यासाठी‎ लवकर नंबर लागावा म्हणून शेतकऱ्यांनी‎ रविवार दुपारी चार वाजेपासूनच‎ येथील खरेदी विक्री संघाच्या आवारात‎ रांगा लावल्या. रात्री उशिरापर्यंत येथील‎ गर्दी वाढतच होती.‎ खासगी बाजारातील भाव हा सरकारी‎ हमी भावापेक्षा कमी असल्यामुळे‎ हरभऱ्याची शासकीय खरेदी सुरू व्हावी,‎ यासाठी या भागातील शेतकऱ्यांनी गेल्या‎ अनेक दिवसांपासून संबंधित यंत्रणेशी‎ पत्रव्यवहार सुरू केला होता. त्यानंतर ही खरेदी सुरू करण्यात आली आहे.

हरभरा नोंदणीसाठी सकाळी कार्यालय उघडले. तेव्हा शेतकऱ्यांची तोबा गर्दी होती. सगळ्यांनी एकाचवेळेस कार्यालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हा गोंधळ, धक्काबुक्की वाढली. शेवटी हरभरा नोंदणी रद्द करण्यात आली. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले. ही बातमी विधिमंडळ अधिवेशनापर्यंत धडकली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पणन सचिव यांच्या बैठक झाली आणि ऑफलाइन नोंदणीसाठीही परवानगी देण्यात आली.