हे तर भलतंच झाले : हे आमदार येताच ‘पन्नास खोके एकदम ओके’च्या घोषणा
-आमदार आल्यापावली परतले
प्रतिनिधी
हिंगोली : जिल्ह्यातल्या कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांची एका लग्न समारंभात चांगलीच गोची झाली. बांगर यांनी लग्नाला हजेरी लावताच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी ‘पन्नास खोके एकदम ओके’ची घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे त्यांचा चेहरा चांगलाच पाहण्यालायक झाला.
मंडप परिसरात सुरू झालेल्या घोषणाबाजीमुळे संतोष बांगर यांनीही लवकरच पाय काढता घेतला. या घोषणाबाजीचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.
–वऱ्हाडी मंडळी कावरी-बावरी
संतोष बांगर यांनी घोषणाबाजी सुरू असताना गप्प राहणे पसंद केले. मात्र, वधू – वर आणि वऱ्हाडी मंडळी कावरी-बावरी झाली. यजमानांची गोची झाली. काही ज्येष्ठांनी पुढाकार घेत कार्यकर्त्यांना आवरले. हे राजकीय व्यासपीठ नाही. लग्नात विघ्न आणू नका, अशी विनंती केली. त्यानंतर घोषणाबाजी करणारे कार्यकर्ते शांत झाले.
एकनाथ शिंदे यांनी बंड केले. उद्धव ठाकरेंना एकटे पाडले. हे सारे केवळ सत्तेपायी झाले, अशी भावना निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळे नेते कुठेही असले, तरी कडवा शिवसैनिक ठाकरेंसोबत आहे. याचा प्रत्यय वारंवार येतो. या अंसतोषालाच संतोष बांगर यांना सामोरे जावे लागले.


