हे आहे कारण : अजितदादावर खुश आहे राष्ट्रवादीचे बंडखोर आमदार
-निधी दिला असं म्हणणं योग्य होणार नाही
प्रतिनिधी
मुंबई : अर्थ खात्याची जबाबदारी स्वीकारल्यानंतर अवघ्या दोन आठवड्यातच अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या बंडखोर आमदारांवर निधीवर्षाव केला. त्यांनी या आमदारांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी 25 कोटी किंवा त्याहून अधिक निधी मंजूर केला. यानंतर विरोधकांकडून जोरदार टीका होऊ लागली आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, केवळ अजित पवारांबरोबर आलेल्या आमदारांनाच निधी दिलेला नाही. भाजपा-सेनेच्या नेत्यांनाही दिला आहे आणि इतरही काही आमदारांना निधी दिला आहे. सर्वांना हा निधी दिला आहे. त्यामुळे केवळ अजित पवारांबरोबर आलेल्या आमदारांना निधी दिला असं म्हणणं योग्य होणार नाही.
–विविध भागात सातत्याने अतिवृष्टी
अतिवृष्टीवर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्याच्या विविध भागात सातत्याने अतिवृष्टी सुरू आहे. काही ठिकाणी 15 दिवसात किंवा एका महिन्यात जितका पाऊस आला पाहिजे तितका पाऊस दोन ते तीन दिवसात पडत आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा तेवढा निचरा होत नाही आणि पाणी जमा होत नाही. त्यातून बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो.
–सगळीकडे अलर्ट
आपण सगळीकडे अलर्ट दिले आहेत. जिथे अतिवृष्टी होणार आहे. तिथे उपाययोजना केल्या जात आहेत. एसडीआरएफ किंवा एनडीआरएफ आवश्यकतेनुसार वेळेत पोहचत आहे. बचाव कार्य सुरू आहे. अतिवृष्टीचा अंदाज आला, तरी तो किती मोठ्या प्रमाणात आहे. परंतू तंतोतंत अंदाज येण आत्ताच कठीण असते. त्यामुळे अनेकदा अपेक्षापेक्षा अधिक पाऊस पडलेला पाहायला मिळतो, असे फडणवीस म्हणाले.
–त्यांचे कौतुक : पाटील
अर्थ खात्याची सूत्रे हाती येताच उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी आपल्या कारभाराची चुणूक दाखवायला सुरूवात केली आहे. आपल्यासोबत सत्तेत सहभागी झालेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांना अर्थमंत्री अजित पवार यांनी भरभरून निधी दिल्याची माहिती मिळत आहे.


