शीतल मात्रे व्हायरल व्हिडिओ: ठाकरे गटाला मोठा दिलासा
-सहा जणांना कोर्टाचा जामीन
प्रतिनिधी
मुंबई : या व्हायरल व्हिडिओ प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणले जाणाऱ्या युवासेनेच्या साईनाथ दुर्गे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. दुर्गेंसह व्हायरल व्हिडिओप्रकरणी आणखी सहा जणांना ताब्यात घेण्यात आले होते. हायकोर्टाकडून यांना आता दिलासा मिळाला आहे. या सातही जणांचा आज कोर्टाकडून जामीन मंजूर झाला. त्यामुळे उद्या त्यांची जेलमधून सुटका होणार आहे.
-अटी पाळल्या गेल्या नाहीत तर
दरम्यान, कोर्टाने या सातही युवासैनिकांचा जामीन मंजूर केला आहे. मात्र त्यांच्यासमोर काही अटी-शर्ती ठेवण्यात आल्या आहेत. या अटी पाळल्या गेल्या नाहीत तर त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते. आरोपींना दर सोमवारी दहिसर पोलिस स्टेशनला हजेरी लावावी लागणार. ते सोशल मीडिया वापरु शकणार नाही. 7 जणांना मुंबई बाहेर जाता येणार नाही, अशा अटींवर आरोपींना 20 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.
=साईनाथ आमचा वाघ आहे
साईनाथ दुर्गे यांना पोलिस कोठडी झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या दादरच्या घरी जावून कुटुंबियांची भेट घेतली होती. यावेळी आदित्य ठाकरे यांनी ‘साईनाथ आमचा वाघ आहे. तो अन्यायाच्या विरुद्ध लढतोय’, अशी प्रतिक्रिया दिली होती.
साईनाथ दुर्गे हे आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आहेत. साईनाथ दुर्गे युवासेना सदस्य आहेत. शिवसेना युवासेना सोशल मीडियाची जबाबदारी त्यांच्यावर आहे.


