राज्य महसूल विभागातील ज्येष्ठता यादी १७ वर्षे प्रलंबित

राज्य महसूल विभागातील ज्येष्ठता यादी १७ वर्षे प्रलंबित
-विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी वेधले सभागृहाचे लक्ष

प्रतिनिधी
मुंबई: राज्यातील महसुल विभागात १७ वर्षे झाली तरी ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात आली नसल्याकडे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.
सेवा ज्येष्ठतेची यादी कधी प्रसिद्ध केली जाईल? तसेच पदोन्नतीनंतरची ८०० रिक्त पदे कधी भरली जाईल, असा सवाल विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला.

गेले २२ वर्षे एकाच पदावर अधिकारी हे कार्यरत असल्यामुळे कामात उत्साह व ताकद कमी होत असल्याची बाब दानवे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.

जात पडताळणी वरिष्ठ श्रेणीची तहसीलदार व इतर अधिकारी पदांची पदोन्नती होत नसल्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरल्या असून एकाच पदावर २० ते २२ वर्षे अधिकारी काम करत असल्याने अनेकांचा कामाचा उत्साह व ताकद कमी होत चालली असून यावर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे असल्याचे दानवे म्हणाले.
त्यावर उत्तर देताना विभागाचे मंत्री म्हणाले की, औरंगाबाद खंडपीठाकडे याबाबत विविध याचिका प्रलंबित आहेत. येत्या २३ मार्चला याबाबत अंतिम सुनावणी होईल. सरकार याबाबत सकारात्मक भूमिका मांडेल. यावर सभापती यांनी राज्य शासनाने कालमर्यादा जाहीर करण्याची सूचना केली असता, पुढच्या ३ महिन्यांत सरकार यावर योग्य ती कारवाई करेल अशी ग्वाही सरकारकडून देण्यात आली.