या योगींनी महाराष्ट्रातून पाच लाख कोटी नेले
-सामनाच्या अग्रलेखातून सरकारवर जोरदार टीकास्त्र
प्रतिनिधी
मुंबई : अयोध्येत महाराष्ट्र भवनाची जागा देण्याचे मान्य करून योगी महाराजांनी मुंबईतून 5 लाख कोटी नेले. म्हणजे महाराष्ट्राच्या हाती आवळा देऊन कोहळा काढण्याचाच हा प्रकार. पण सत्तेवर दुर्बळ, लाचार, बधिर सरकार असल्यावर दुसरे काय व्हायचे? मुख्यमंत्र्यांना फक्त चाळीस आमदारांच्या खोक्यांची काळजी. माणसाला त्याच्या लायकीपेक्षा वरचे पद मिळाले की हे असे घडायचेच. असे म्हणत आजच्या सामनाच्या अग्रलेखातून पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना डिवचण्यात आले आहे.
– मुख्यमंत्री कुठे होते?
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मुंबईत येऊन उद्योगपतींशी चर्चा करीत होते. येथील गुंतवणूकदारांना लखनौला येण्यासाठी निमंत्रित करीत होते, तेव्हा आपले मुख्यमंत्री नाशकातील पालापाचोळा कचरा गोळा करून ठाकऱ्यांची शिवसेना फोडण्याचा आव आणीत होते व त्या पालापाचोळयासमोर दंड ठोकून भाषण करीत होते.
-महाराष्ट्र सरकार गंभीर नाही
उत्तर प्रदेश-बिहारचे राज्यकर्ते मुंबईत येऊन येथील गुंतवणुकीची लूट करीत आहेत व मुख्यमंत्री शिवसेना पडण्याच्या कामात रमले आहेत. माणसाला त्याच्या लायकीपेक्षा वरचे पद …मिळाले की हे असे घडायचेच. योगी मुंबईतून उत्तर प्रदेशात गुंतवणूक नेत आहेत व मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस व त्यांचे बिरहाड पुढील महिन्यात गुंतवणूक आणण्यासाठी जर्मनीतील दावोसला बर्फात खेळण्यासाठी, बर्फ उडवण्यासाठी चालले आहेत. योगींनी येथील उद्योगपतींना सांगितले, “उत्तर प्रदेशात तुम्ही आणि तुमची गुंतवणूक सुरक्षित राहील याची हमी देतो.” महाराष्ट्र सरकारने ही बाब गांभीर्याने घ्यायला हवी. महाराष्ट्रातून गेल्या पाच महिन्यांत वेदांत फॉक्सकॉन, ड्रग्ज पार्क, एअर बससारखे प्रकल्प बाहेर गेले.
–हा तर गुजरात पॅटर्न
सध्याच्या सरकारवर विश्वास नसल्यामुळेच हे झाले. योगी उत्तर प्रदेशातील सिनेसृष्टीच्या प्रकल्पावर जोर देत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी देशासमोर ठेवलेल्या पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी देशातील प्रमुख राज्यांत स्पर्धा लागली आहे, पण ‘मॅचफिक्सिंग’ करुन फक्त गुजरातलाच पुढे नेण्याचे धोरण दिसते


