मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान! 50 खोक्यावरून बदनाम करू नका
-कडू व राणामधील वाद संपुष्टात येणार
प्रतिनिधी
मुंबई : 50 आमदार माझ्यासोबत पैशाच्या लालसेपोटी आले नाहीत, त्यांना उगीच 50 खोक्यावरून बदनाम करू नका, अशी स्पष्टता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
शिंदे यांच्या भूमिकेमुळे आता बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद संपुष्टात येणार असल्याची चिन्हे आहे.
पश्चिम बंगालमध्ये धाड पडली तेव्हा 27 कोटी रुपयांसाठी टेम्पो लागला. मग 50 कोटींचे ट्रक का दिसले नाही? लोकांची दिशाभूल करू नका, पैशाच्या लालसेपोटी हे 40 आमदार माझ्यासोबत आले नाहीत. या लोकांना बदनाम करण्याचे काम तुम्ही कराल तेवढे खड्ड्यात लोक तुम्हाला टाकतील, जनाची नाही तर मनाची ठेवा. यामुळे शिवसैनिकांचे खच्चीकरण होत असल्याचा पलटवार मुख्यमंत्री शिंदे यांनी केला.
-अडीच वर्ष थांबलेले प्रकल्प मार्गी
आरोप प्रत्यारोप करता आहेत मात्र आम्हाला कामातून उत्तर द्यायचे आहे.फडणवीस सरकारच्या काळातील प्रकल्प अडीच वर्षे थांबले होते, मात्र आपले सरकार आता सर्व प्रकल्पला आता चालना देतो आहेत. जे शेतकरी वेळवर परतफेड करतात. अशा शेतकऱ्यांना सरकारने मदत केली. अडीच हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना दिलेत.गणपती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. त्यानंतर लोकांची दिवाळी गोड केली आहे. माय माऊलींसाठी अनेक योजना आम्ही आणणार आहेत. हे राज्य सर्वसामान्यांसाठी आहे.
आज आम्ही जिकडे जिकडे जात आहोत. तिथल्या लोकांचे प्रेम मिळत आहे. मी मुख्यमंत्री पदासाठी हा निर्णय घेतला नाही मी लोकांचा न्यायासाठी हा निर्णय घेतला आहे.पश्चिम बंगालमध्ये पैसे सापडले तेव्हा गाडी लागली होती. आता किती ट्रक लागतील. धर्मवीर सिनेमाचा डायलॉग सांगत खासदारांना माफी नाही, असे म्हणत गद्दारांना अद्दल घडवली. मतदान युतीला केले, पण झाले वेगळे म्हणून सर्वात मोठी क्रांती केली.


