बोम्बई राजकारण करताहेत: या युवा नेत्यांचा प्रहार

बोम्बई राजकारण करताहेत: या युवा नेत्यांचा प्रहार

-रोहित पवार यांचा आरोप

प्रतिनिधी

नागपूर : बेळगावमध्ये जेव्हा कर्नाटक सरकार अधिवेशन घेते तेव्हा एकीकरण समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मिळून मराठी माणसाचा आवाज तिथे मांडत असतात आणि सिम्बॉलिक पद्धतीने आंदोलन करत असतात. काही दिवसांपूर्वी महा विकास आघाडीचे सर्व खासदार यांनी मिळून एक बैठक लावावी, अशी विनंती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना करण्यात आली. त्यानंतर एक बैठक लागली त्यात कर्नाटकचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपस्थित होते. त्या बैठकीत आम्ही काळजी घेऊ, कुठल्याही मराठी माणसाला अडचण आणणार नाही, असा शब्द कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दिला होता. मात्र, आज बेळगावमध्ये बघितलं तर प्रथेप्रमाणे महाराष्ट्रातील नेते, पदाधिकारी आंदोलन करत असताना अनेक लोकांना ताब्यात घेण्यात आलं. याचाच अर्थ कर्नाटकचे भाजपचे मुख्यमंत्री सत्तेचं राजकारण करत आहेत. येत्या ४ महिन्यात होणाऱ्या कर्नाटकच्या निवडणुकांचं त्यांना पडलं आहे. हे करत असताना महाराष्ट्राच्या व मराठी माणसांच्या अस्मितेला त्या ठिकाणी तडा जात असल्याचं आपलं मत असल्याचे रोहित पवार म्हणाले.