नागपुरातील या भाजपाच्या नेत्याविरुद्ध वाढली पक्षांतर्गत धुसफूस, हे ठरले कारण?

-ते आहे कट्टर गडकरी समर्थक

प्रतिनिधी
नागपूर : अल्पसंख्याक आयोग ही एक संवैधानिक संस्था असून धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकांच्या हक्कांचे रक्षण करणे, या समुदायाविरुद्ध होणारा भेदभाव, अन्याय किंवा गैरवर्तन रोखणे हे या आयोगाचे काम आहे. त्याच्या अध्यक्षपदी सत्ताधारी पक्षाकडून राजकीय नियुक्त्या केल्या जातात. त्यामुळे अध्यक्षाने पक्षाच्या विचारानुसार काम करावे, अशी सर्वसाधारण अपेक्षा असते. विद्यमान अध्यक्ष प्यारे खान हे याला अपवाद ठरले आहेत. प्रत्येक घटनेमागे हिंदू-मुस्लिम शोधणाऱ्या भारतीय जनता पक्षाने त्यांची या पदावर नियुक्ती केली असली तरी खान तटस्थ राहून कर्तव्य पालन करीत आहेत. अमरावती जिल्ह्यातील अल्पवयीन मुलींच्या लैंगिक छळ प्रकरणात त्यांनी मुस्लिमांची बाजू घेतल्याने भाजपमधील कट्टर हिंदुत्ववादी त्यांच्यावर संतापले आहेत. खान हे कट्टर गडकरी समर्थक मानले जातात हे येथे उल्लेखनीय.

अमरावती जिल्ह्यातील अस्पवयीन मुलींच्या लैंगिक छळाचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. या प्रकरणातील आरोपी हा मुस्लिम तरुण असल्याने तर भाजपमधील कट्‌ट्र हिंदुत्ववादी गट अधिक आक्रमक झाला. आरोपीने हिंदू मुलींवरही अत्याचार केला,अशी अफवाही या गटाकडून पसरवण्यात आली. एकूणच या मुद्यावरून दोन धर्मात तेढ कसे निर्माण करता येईल यासाठी झालेले प्रयत्न लपून राहिलेले नाही. या पार्श्वभूमीवर अमरावती सारख्या अलीकडच्या काळात जातीय तणावाच्या मुद्यावरून अतिसंवेदनशील झालेल्या जिल्ह्यात राज्य अल्पसंख्याक आयोगाची भूमिका महत्वाची होती. आयोगाचे अध्यक्ष सत्ताधारी पक्षाचा नेताच असल्याने तो पक्षाच्या धोरणाविरुद्द भूमिका घेणार नाही, असे भाजपमधील कट्टर हिंदुत्ववादी नेत्यांनाही वाटत होते. पण घडले वेगळेच.

परतवाडा प्रकरणात खान याची भूमिका
आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी परतवाडा भागाचा दौरा केला, जिल्हा पोलीस अधीक्षकांशी चर्चा करून या घटनेची सर्व माहिती जाणून घेतली, त्यानंतर त्यांनी भूमिका मांडली. या प्रकरणातील आरोपी मुस्लिम असला तरी त्याच्यावर कारवाई केली जावी हे सांगतानाच त्यांनी या प्रकरणात कुठल्याही हिंदू मुलींवर अत्याचार झाला नाही हे स्पष्ट केले. या कारणावरून जे नेते हिंदू-मुस्लिम वाद भडकावण्याचा प्रयत्न करीत होते, त्यांनाही प्यारे खान यांनी फटकारले. विशेषत: भाजप नेत्या नवीनत राणा या या प्रकरणावरून दंगल घडवून आणण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यांनी हिंदू मुलींवर अत्याचार झाल्याचे् खोटे सांगून त्यांची बदनामी केली, त्यामुळे त्यांना पक्षातून काढून टाकावे,अशी मागणी खान यांनी करून पक्षातील कट्टर हिंदूत्ववादी नेत्यांना चांगलेच सुनावले. त्यामुळे त्याच्या प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविकच होते. तशा त्या उमटल्याही.

आपल्याच पक्षाच्या सरकारने नियुक्त केलेला अल्पसंख्याक आयोगाचा अध्यक्ष आपल्यालाच फटकारतो, यामुळे भाजपमधील कट्टरवादी गट प्यारे खान यांच्यावर कमालीचा संतापला. सध्या पक्षात कट्टरवादाचे समर्थन करणाऱ्यांची संख्या तुलनेने संयत व मावळ भूमिका घेणाऱ्या नेत्यांपेक्षा अधिक आहे. प्यारे खान हे मावळ गटाचे म्हणजे केद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे समर्थक मानले जातात. गडकरी हे स्वत: सर्वधर्मियांना सोबत घेऊन राजकारण करतात. याच माध्यमातून प्यारे खान यांची गडकरी यांच्याशी ओळख झाली. खान हे वाहतूक व्यावसायिक आहेत. राज्यात कोविडची साथ असताना ॲाक्सिजन टंचाई निर्माण झाली होती. नागपूरमध्ये स्थिती चिंतानजक होती, अशा काळात गडकरी यांच्या विनंतीवरून प्यारे खान यांनी त्यांचे सर्व टॅन्कर नागपूरमध्ये ॲाक्सिजन पुरवठ्यासाठी लावले होते. त्याचे सामाजिक क्षेत्रातील काम पाहूनच गडकरी यांनी त्यांच्या नावाची राज्य अल्पसंख्यांक आयोगाच्या अध्यक्षपदासाठी वर्णी लावली.

अध्यक्षपदाची सुत्रे स्वीकारल्यापासून खान हे कधी हिंदू-मुस्लिम वादात पडले नाही, अल्पसंख्याकांचे शैक्षणिक उत्थान यावर त्यांनी अधिक भर दिला. मुस्लिमांचे चुकले असेल तर तेथे त्यांनी त्यांच्या विरोधात भूमिका घेतली पण जेथे समाजाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न होतो,असे त्यांच्या लक्षात आले तेथे त्यांनी मुस्लिमांच्या संरक्षणाची भूमिका घेतली. परतवाडा प्रकरणात त्यांनी हेच केले. पण ते भाजपमधील कट्टर हिंदुत्ववाद्यांना आवडले नाही. खान यांना त्यांच्या पदावरून तातडीने हटवण्याची मागणी होऊ लागली. नवनीत राणा यांनी पत्रकार परिषद घेऊन खान यांच्यावर टीका केली व नाशिकमधील एका कार्पोरेट कंपनीतील धर्मांतरण प्रकरणात ते गप्प का होते ? असा सवाल केला. खान गडकरी समर्थक नेते आहेत, हे माहिती असूनही राणा यांनी त्यांच्यावर टीका करणे यावरून कट्टरवाद्यांच्या संतापाची तीव्रता लक्षात येते. सध्या पक्षात कट्टरवादी नेत्याचे वर्चस्व बघता प्यारे खान यांच्या विरुद्ध मोहीम पुढच्या काळात अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

दरम्यान फक्त परतवाडाच नव्हे तर नागपूर आणि यवतमाळमधील घटनेला हिंदू-मुस्लिम रंग देण्याचा प्रयत्न भाजपच्या अंगलट आला आहे. नागपूरमध्ये एका संस्थेच्या संचालकावर कथित धर्मांतरणाचा आरोप करण्यात आला. पण पोलिसांच्या तपासात तसे काही आढळून आले नाही, यवतमाळ जिल्ह्यात आदिवासी मुलीं बेपत्ता होण्याच्या प्रकरणातही हेच घडले. एकूकडे कट्टरवादी सामाजिक वाद निर्माण करून राजकीय वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करीत असताना दुसरीकडे पोलीस असो किंवा अल्पसंख्याक आयोग हे लोकांपुढे सत्य मांडत आहेत. त्यामुळे भाजपची कोंडी होत आहे.