नरेंद्र मोदींची दक्षिण झेप; तेलंगणात 11 हजार 300 कोटी

नरेंद्र मोदींची दक्षिण झेप; तेलंगणात 11 हजार 300 कोटी
– तिरुपती वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा

प्रतिनिधी
तेलंगणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तेलंगणा आणि तामिळनाडू दौऱ्यावर आहेत. यादरम्यान ते विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ते आधी तेलंगणाला जाणार आहेत. ज्या ठिकाणी ते 11,300 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे प्रकल्पांना भेट देतील.

प्रथम ते तेलंगणातील सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर सकाळी 11.45 वाजता पोहोचतील. जिथे ते सिकंदराबाद ते तिरुपती वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. यासोबतच सिकंदराबाद रेल्वे स्थानकाच्या 720 कोटींच्या पुनर्विकास प्रकल्पासोबतच इतर रेल्वे प्रकल्पांची पायाभरणीही करणार आहेत. त्यानंतर दुपारी 12.15 वाजता ते हैदराबादच्या परेड ग्राऊंडवर जाहीर सभेला संबोधित करतील तसेच बीबीनगरातील एम्सची पायाभरणी देखील करतील. त्याचबरोबर 5 राष्ट्रीय महामार्ग देखील लोकार्पण करतील.

-तेलंगणातून तीन महिन्यांत दुसरी वंदे भारत ट्रेन सुरू होणार
सिकंदराबाद-तिरुपती वंदे भारत एक्स्प्रेस हैदराबादला तिरुपती येथील भगवान व्यंकटेश्वराच्या मंदिर शहराशी जोडणारी 3 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत तेलंगणातून दाखल होणारी दुसरी वंदे भारत ट्रेन आहे. ही ट्रेन सुरू झाल्याने दोन्ही शहरांमधील प्रवासाचा वेळ सुमारे साडेतीन तासांनी कमी होणार आहे.

-7,850 कोटी निधीतून राष्ट्रीय महामार्गाची पायाभरणी
पंतप्रधान मोदी 7,850 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाची पायाभरणी करतील. हे रस्ते तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातून जातील. त्यानंतर मोदी तामिळनाडूला रवाना होणार आहेत.

-तामिळनाडूत चेन्नई विमानतळावरील नवीन टर्मिनलचे करणार उद्घाटन
दुपारी 3 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी चेन्नई विमानतळावर पोहोचतील. जिथे ते नवीन टर्मिनलचे उद्घाटन करतील. त्यानंतर संध्याकाळी चेन्नई रेल्वे स्थानकावर ते चेन्नई-कोइम्बतूर वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील.