कोण म्हणतात, सध्याच्या सत्तासंघर्षावर ‘तारीख पे तारीख’

कोण म्हणतात, सध्याच्या सत्तासंघर्षावर ‘तारीख पे तारीख’

-पक्षनेते अंबादास दानवेंची प्रतिक्रिया

प्रतिनिधी
मुंबई : न्यायालयाने सत्तासंघर्षावरील सुनावणी १४ फेब्रुवारी रोजी घेण्याचा निर्णय आज दिला. सतत अशा पद्धतीने ‘तारीख पे तारीख’चा खेळ सुरू आहे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सत्तासंघर्षाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली त्यावर दिली.

अनिल कपूरच्या मेरी जंग या चित्रपटाची आठवण झाली. सर्व परिस्थितीसमोर आहे. पक्षांतरबंदीचा कायदा आहे. आयोग काय बोलतं हे समोर आहे. निदान फेब्रुवारीच्या १४ तारखेला तरी कोर्ट निर्णय देईल, अशी अपेक्षा दानवे यांनी व्यक्त केली.

सुप्रीम कोर्टात हा विषय सुरू असताना निवडणूक आयोग घाई का करतयं, असा सवाल देखील दानवे यांनी उपस्थित केला. वैधानिकदृष्ट्या हे सरकार वैध नाही. पक्षांतर कायदा ही तेच सांगतो. त्यामुळे शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांनी राजीनामा देऊन खुशाल दुसऱ्या पक्षात जावे, अस दानवे म्हणाले. मंत्री मंडळाचा विस्तारही सुप्रीम कोर्टाच्या तारखेनुसारच सुरू आहे. त्यालाही ‘तारीख पे तारीख’ मिळत असल्याची मिश्किल टीका दानवे यांनी केली.

-रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्या वक्तव्यांकडे पहावं
छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे, तोपर्यंत शिवसेनेचे भविष्य उज्वल आहे. आमदार रवी राणा यांनी बच्चू कड्डूंच्या वक्तव्यांकडे पहावं, आम्हालाही तोंड उघडायला लावू नका. तसेच राणा पति-पत्नी आमदार व खासदार यांनी आपल्या मतदारसंघात लक्ष द्यावे, असा टोला दानवे यांनी राणा यांना लगावला.

पंतप्रधानांना पालिका निवडणुकीसाठी यावं लागतं

एका महापालिकेच्या निवडणुकीला देशाच्या पंतप्रधांनाना यावे लागते. यावरून येथील नेतृत्व महाराष्ट्रात किती मोठं आहे हे सिद्ध होतं, आणि हा शिवसेनेचा विजय आहे हे मानावं लागेल अशी प्रतिक्रिया दानवे यांनी पंतप्रधानांच्या मुंबईतील दौऱ्यावर दिली.