कोण आहे त्या? भाजपाच्या या युवा नेत्याला तिकीट दिल्याने आश्चर्य
-नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदासाठी केला होता त्यांच्या आईने विरोध
प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्लीमधील सात जागांपैकी भाजपने पाच जागांचे उमेदवार निश्चित केले आहेत. एकीकडे दिल्लीत आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांनी एकत्र लोकसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केलीय. तर दुसरीकडे, भाजपने पाचपैकी चार जागांवर नवीन उमेदवार दिले आहेत. गतवर्षी विजयी झालेल्या मनोज तिवारी यांना सोडून भाजपने या निवडणुकीत चार विद्यमान खासदारांची तिकिटे रद्द केली आहेत. नवी दिल्ली या महत्वाच्या मतदार संघातही मीनाक्षी लेखी यांचे तिकीट रद्द करण्यात आलेय. त्या ऐवजी पक्षाने बन्सुरी यांना तिकीट दिलीय. पक्ष नेतृत्वाच्या या निर्णयाने भाजप नेतेही आश्चर्यचकित झाले आहेत.
बन्सुरी यांच्या नावाची घोषणा होताच भाजपने राजधानीत निवडणुकीचे वातावरण तयार केले आहे. नवी दिल्ली मतदारसंघातून आपने सोमनाथ भारती यांना उमेदवारी दिली आहे. सोमनाथ भारती हे विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. अशावेळी भाजपने नवख्या बन्सुरी यांना उमेदवारी दिलीय. बन्सुरी यांनी या निवडणुकीत आपचे सोमनाथ भारती यांचा पराभव केला तर दिल्ली भाजपमध्ये त्या एक मजबूत नेता म्हणून उदयास येतील. तसेच, तो मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही धक्का असेल. कारण अरविंद केजरीवाल नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.


