काँग्रेसचा बडा नेता म्हणतो, रश्मी बर्वे यांचा अर्ज रद्द मागे या शक्तीचा हाथ
-रामटेक सेफ झोनमध्ये
प्रतिनिधी
नागपूर : पूर्व विदर्भातील रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये जे काही सुरू आहे. त्यावरून विरोधक भाजपवर चांगलेच तोंडसुख घेत आहेत. जात पडताळणी समितीने काँग्रेसच्या उमेदवार, नागपूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवला. यामध्ये भाजपचा हात असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांकडून केला जात आहे. यावरूनच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर घणाघाती आरोप केले.
गोंदिया येथे पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, काँग्रेस पक्षाने दुसऱ्या उमेदवाराचा बॅकअप फॉर्म भरलेला होता. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. परंतु सरकारी यंत्रणांचा गैरवापर भाजपने निवडणुकीच्या काळातही थांबवलेला नाही. कारण भाजप पक्ष घाबरलेला पक्ष आहे आणि त्यामुळे लोकसभा निवडणुकीत आपला पराभव होईल, या भीतीने अशा प्रकारची कामे भाजप नेते करीत आहेत. रामटेकमध्ये लढण्यासाठी उमेदवार आणला, तोसुद्धा दुसऱ्या पक्षाचा. एवढ्यावरही समाधान झाले नाही, तर आमच्या उमेदवाराचा अर्ज यंत्रणेच्या माध्यमातून अवैध ठरवला.


