हे आहे कारण ? अयोध्या सोहळ्याला हे बडे नेते येणार नाही
-मंदिर वही बनायेंगे’चा नारा ५०० वर्षानंतर प्रत्यक्षात
प्रतिनिधी
अयोध्या : भारतीय जनता पक्षाचे बडे नेते लालकृष्ण अडवाणी यांनी 1990 च्या दशकात राम मंदिर आंदोलन सुरु केले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली 1990 साली भाजपने गुजरातमधील सोमनाथ येथून राम रथयात्रा काढली होती. ‘मंदिर वही बनायेंगे’चा नारा देऊन लालकृष्ण अडवाणी यांनी राम मंदिर आंदोलन सुरु केले. लालकृष्ण अडवाणी यांनी हे आंदोलन सर्वसामान्यांपर्यंत नेले होते. यामुळेच विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष आलोक कुमार आणि इतर अधिकारी स्वतः लालकृष्ण अडवाणी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते. परंतु लालकृष्ण अडवाणी आणि भाजपचे दुसरे बडे नेते मुरली मनोहर जोशी प्राणप्रतिष्ठा समारंभात येणार नाही.
– अडवाणी म्हणाले…!
अडवणी यांनी म्हटले की, दीर्घ प्रतिक्षेनंतर आम्ही भारताच्या ‘स्व’ चे प्रतीक पुन्हा तयार केले. ते आपल्या सर्वांच्या प्रयत्नांच्या जोरावर पूर्ण झाले आहे. आपण आपली दिशा शोधण्याचा प्रयत्न अनेक दशकांपासून करत आहोत, आपल्याला ती सापडली आहे आणि ती प्रस्थापित झाली आहे. आता प्रत्येक भारतीच्या मनात एक विश्वास निर्माण झाला आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामुळे संपूर्ण देशातील वातावरण मंगलमय झाले आहे. या वेळी आपणास प्रत्यक्ष तिथे हजर राहण्याची संधी मिळणे म्हणजे कुठल्यातरी जन्मात कुठेतरी केलेले चांगले कृत्य केल्याचे फळ आहे.


