हिवाळी अधिवेशन : नागपुरात अजितदादाचा बंगला या मंत्र्याच्या शेजारी

हिवाळी अधिवेशन : नागपुरात अजितदादाचा बंगला या मंत्र्याच्या शेजारी

-साफसफाई आणि डागडुजीला सुरुवात

प्रतिनिधी
नागपूर : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून नागपूरमध्ये सुरु होत आहे. अधिवेशनानिमित्ताने संपूर्ण राज्यमंत्रीमंडळ नागपूरमध्ये येणार आहे. त्यामुळे नागपूरमध्ये मंत्र्याचे बंगले, सचिवांचे बंगले, आमदार निवास, अधिकाऱ्यांची शासकीय निवासस्थाने यांच्या साफसफाई आणि डागडुजीला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह आठ मंत्र्यानी शपथ घेतली. मात्र, त्यांच्यासाठी नागपूरमध्ये अद्याप शासकीय निवासस्थानाची व्यवस्था करण्यात आली नव्हती. परंतु, आगामी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अजितदादा यांच्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने नागपूरमध्ये प्रशस्त बंगला शोधला आहे.

नागपूर अधिवेशन दरम्यान मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद सभापती यांना राहण्यासाठी सिव्हील लाईन्स येथे प्रशस्त बंगले बांधण्यात आले आहेत. सिव्हील लाईन्समध्ये कॅबिनेट मंत्री, विधानसभा अध्यक्ष यांच्यासाठी रवी भवन येथे बंगले आहेत. तर नाग भवन परिसरात राज्यमंत्री यांच्यासाठी छोटे बंगले राखीव असतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळात 29 मंत्री आहेत. हे सर्व मंत्री कॅबिनेट मंत्री आहेत. तर मंत्रीमंडळातील १४ मंत्री पदे अजून रिक्त आहेत.

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत आणखी 7 मंत्र्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. शिंदे सरकारचे यंदा होणारे अधिवेशन हे दुसरे अधिवेश आहे. तर, अजित पवार यांचे शिंदे सरकारमधील उपमुख्यमंत्री म्हणून पहिले अधिवेशन आहे. त्यामुळे आता सत्तेत सामील झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी शासकीय निवासस्थान देण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम खात्यावर आली होती.