शिंदेही अलर्ट: भाजपाच्या या कारणामुळे घेतला निर्णय

शिंदेही अलर्ट: भाजपाच्या या कारणामुळे घेतला निर्णय

– शिंदेसेनेच्या सर्व खासदारांची बोलाविली बैठक

प्रतिनिधी
मुंबई : लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी भाजपनं जोरदार तयारी सुरु केली आहे. महाराष्ट्रात भाजपनं ‘मिशन ४८’च्या दृष्टीनं पावलं टाकली आहे.काही दिवसांपूर्वीच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे दोन दिवसीय महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी देवेंद्र फडणवीसांसह नड्डांनीही आगामी निवडणुका जिंकण्याचा निर्धार बोलून दाखवला आहे. याच पार्श्वभूमीवर आता एकनाथ शिंदेंही अॅक्शन मोडमध्ये आले आहेत.

यांनी उद्या (दि.२३) वर्षा या निवासस्थानी शिवसेनेच्या सर्व खासदारांची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत लोकसभा निवडणुकीवर चर्चा होणार आहे. त्यामुळे बैठकीत काय मोठी रणनीती ठरवली जाते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. बैठकीत पक्षाची संघटनात्मक बांधणी, 2024 च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन व्यूहरचना आखली जाणार असल्याचं समोर आलं आहे. मतदारसंघातील प्रलंबित कामांचा आढावा देखील घेतला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांकडून खासदारांना जबाबदाऱ्या देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. तसेच या खासदारांच्या मतदारसंघात मुख्यमंत्र्यांच्या सभा घेण्यावरही चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, बैठकीचा तपशील कुणालाही देण्यात आलेला नाही. त्यामुळे बैठकीत नेमकी कशावर चर्चा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.