शरद पवारांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री शिंदे यांनी केली ही मोठी घोषणा

शरद पवारांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री शिंदे यांनी केली ही मोठी घोषणा

-निमित्त होते नमो रोजगार महामेळाव्याचे

प्रतिनिधी
पुणे : पुणे जिल्ह्यातील बारामती येथे आयोजित करण्यात आलेल्या विभागस्तरीय ‘नमो महारोजगार मेळाव्या’चा उद्घाटन सोहळा आज संपन्न झाला. यासोबतच बारामती येथील विविध विकासकामांचे उद्घाटन आणि लोकार्पण देखील करण्यात आले.

आज बारामती येथे आयोजित करण्यात आलेल्या नमो महारोजगार मेळाव्यातून स्वतःचे आणि राज्याचे भविष्य घडवण्याची संधी तरुणांना मिळाली आहे. राज्यातील तरुणांना ७५ हजार रोजगार देण्याची घोषणा सरकारने केली होती. आजवर १ लाख तरुणांना रोजगार दिले असून आज याठिकाणी देखील २५ हजार तरुणांना रोजगार देण्यात येतील असे सांगितले. शासन आपल्या दारी मधूनही २ कोटी ६० लाख नागरिकांना विविध योजनांचे थेट लाभ मिळवून देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

बारामतीत उभ्या राहिलेल्या या इमारती विकासाचे मॉडेल आहे. या इमारतीत कुठेही दर्जाशी तडजोड केली गेलेली नाही. पोलीस हे प्रत्येक परिस्थितीत काम करत असतात त्यामुळे त्यांना चांगली घरे देणे गरजेचे आहे ते काम बारामतीमध्ये झाले आहे. येथील बसस्टँड देखील मॉडेल बसस्टँड आहे. बारामतीचा विकास खासदार शरद पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही केला असून यापुढे देखील बारामतीमधील विकासकामांना निधी कमी पडू देणार नाही, असं आश्वासन एकनाथ शिंदेंनी दिले.