राहुल गांधींनी का मानले ? महाराष्ट्रातील जनतेचे आभार !
-आम्ही जोडण्याचे काम करतो, विरोधक तोडण्याचे काम
प्रतिनिधी
बुलढाणा : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आज शेगावमध्ये सभा झाली. या सभेपूर्वी राहुल गांधी यांनी शेगाव येथे संत श्रीगजानन महाराज यांचे दर्शन घेतले. राहुल गांधींच्या या सभेला मोठी गर्दी झाली होती. मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि लोकांनी उपस्थिती लावली. यावेळी राहुल गांधी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले. भारत जोडो यात्रेत आम्ही जोडण्याचे काम करतो तर विरोधक तोडण्याचे काम करत आहेत, अशी टीका राहुल गांधींनी केली.
शिवाजी महाराजांनी संपूर्ण जागाला दिशा दाखवली. ही महाराष्ट्राची पुण्यभूमी आहे. शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आवाज होते. आणि शिवाजी महाराजांना राजमाता जीजाऊंनी दिशा दाखवली. आपण त्यांचे हे मोलाचे कार्य कधीच विसरू शकत नाही. जे शिवाजी महाराजांनी आणि महापुरुषांनी म्हटले, तेच काम ही भारत जोडो यात्रा करीत आहेत. हे तुम्ही पूर्णपणे जाणून आहात. कारण या यात्रेला पूर्णशक्तीनिशी काम केले. भरपूर प्रेम तुम्ही दिले. हे सोपं काम नाही. ३ हजार ५०० किमी चालणं हे इतकं सोपं नाही. पण ते काम तुम्ही सोपं केले, असे राहुल गांधी म्हणाले.
सभेत व्यासपीठावर बसलेल्या नेत्यांचे चेहरे बघा, माझा चेहरा बघा कुणाच्याच चेहऱ्यावर थकवा दिसून येत नाही. याचे सर्व श्रेय तुमचे आहे. तुम्ही आम्हाला प्रेम दिले, आम्हाला मदत केली. एवढचं नव्हे तर या यात्रेत आम्हाला खूप काही शिकवलं. महाराष्ट्रातील शेतकरी, तरुण आणि मातांनी आम्हाला खूप काही शिकवले आहे. यासाठी तुम्हा सर्वांचे हृदयापासून आभार मानतो. महाराष्ट्राच्या जनतेने मला भरभरून प्रेम दिले, शक्ती दिली आणि ज्ञान दिले, हे मी आयुष्यभर विसरणार नाही, असं म्हणत राहुल गांधी यांनी आपलं भाषण संपवले.


