राष्ट्रवादी म्हणते, महाराष्ट्रात अशी पद्धत यापूर्वी नव्हती
– आव्हाडांची प्रतिमा मलिन करण्याचे काम
प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांचं ट्विट पाहून मलाही धक्का बसला आहे. अशा पद्धतीने त्यांच्यावर खोटे आरोप करून सरकार त्यांना जेरबंद करू इच्छित आहे. आपल्या महाराष्ट्रात सरकारकडून अशी कारवाई होणे हे दुर्दैवी आहे. आव्हाडांसारखा विधानसभेचा सदस्य आणि मंत्री राहिलीली व्यक्ती मुख्यमंत्र्यांच्या गाडीसमोर असे कोणतेही कृत्य करू शकणार नाही. तरी त्यांच्यावर आरोप करणे आणि त्यांच्यावर अतिशय गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करणे, यातून आव्हाडांची प्रतिमा मलिन करण्याचे काम करण्यात येत आहे.
महाराष्ट्रात अशी पद्धत यापूर्वी नव्हती, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली आहे. दुर्दैवाने गेल्या काही तासांत सतत कारवाया होत आहे. आव्हाड यांना जाणूनबुजून टार्गेट करण्यात येत आहे. हे सरकार किती खूनशी प्रवृत्तीने काम करते. एखाद्या विरोधात काम करायचे म्हटल्यावर व्यक्तीगत जीवनात किंवा व्यक्तीगत स्तरावर जाऊन निंदा नालस्ती करण्याची व्यवस्था होते, आश्चर्य वाटते. आपल्या महाराष्ट्रात असे घडणे चुकीचे आहे. जे पोलीस अधिकारी आहे. त्यांना हे कळत नाही का? सरकार येतात आणि जातात आपल्याला रितसर नियमाने नोकरी करायची, हे समजले पाहिजे. वरून कोणीतरी सांगते आणि म्हणून पोलीस अधिकारी ज्या पद्धतीने निर्णय घेत आहे. त्यात उद्या कोणत्या प्रकारची वागणूक नवे सरकार आल्यावर देईल याचाही आपण अभ्यास केला पाहिजे. हा सगळाच प्रकार दुर्दैवी आहे, असे जयंत पाटील म्हणाले.


