या मंत्र्यांची फिल्ण्डिंग; मुंढेंच्या बदलीचे तक्रार पत्र व्हायरल

या मंत्र्यांची फिल्ण्डिंग; मुंढेंच्या बदलीचे तक्रार पत्र व्हायरल
-समज देऊनही सुधारणा होत नसल्याचे गाऱ्हाणे

प्रतिनिधी
मुंबई : सुपर क्लास वन अधिकारी तुकाराम मुंढेंच्या बदलीसाठी राज्याचे मंत्री तानाजी सावंतांनी यांनी स्वत: पत्र लिहिले होते. सावंत यांनी लिहिलेले पत्र माध्यमांच्या हाती लागले आहे. या पत्रात तुकाराम मुंढे हे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना धमकावत असल्याचीही तक्रार सावंतांनी केली आहे. तुकाराम मुंढे यांना कामकाजाच्या सुधारणेबाबत समज देऊनही सुधारणा होत नाही, असे या पत्रात म्हटले आहे.

मोबाइलवरून फोन केला असता त्याला अजिबात प्रतिसाद न देणे. तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीमुळे डॉक्टर्स संघटना आक्रमक झाल्या असल्याचे देखील पत्रात म्हटले आहे. अधिकारी, कर्मचारी यांना धमकावणे आणि मंत्री कार्यालय संपर्क न ठेवण्याच्या सूचना मुंढेंकडून दिल्या गेल्या असल्याचंही पत्रात म्हटले आहे. तानाजी सावंत यांनी याआधी बोलताना तुकाराम मुंढेंची बदली प्रशासकीय आहे, माझा त्या हात नाही, असं म्हटलं होते. बदलीच्या आधी मुंढे आणि मी एका बैठकीनिमित्ताने भेटलो होतो, त्यानंतर मला त्यांची बदली झाल्याचे कळले असे तानाजी सावंत यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटले होते.

– काय म्हटले पत्रात तानाजी सावंत यांनी ?

आशा वर्कर्स व परिचर यांच्यासमोर स्फोटक वक्तव्य करून आंदोलकांच्या भावना दुखावणे. कार्यकारी अभियंता सोनवणे यांना अचानक कामावरून काढून टाकणे.
मोबाईलवरून फोन केला असता त्याला अजिबात प्रतिसाद न देणे. तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीमुळे डॉक्टर्स संघटना आक्रमक झाल्या आहेत. उपरोक्त सर्व बाबी प्रशासकीय कामकाजात अक्षम्य ठरत असल्याची माझी धारणा आहे. मुख्यमंत्र्यांनी समज देऊनही सुधारणा दिसून न येता शासनाची प्रतिमा मलिन करण्याची वृत्ती दिसून येते. त्यामुळे तुकाराम मुंढे यांची तत्काळ बदली करण्यात यावी, अशी नम्र विनंती आहे, असे तानाजी सावंत यांनी पत्रात म्हटले आहे.

– तुकाराम मुंढेंची बदली रद्दसाठी निवेदन

तुकाराम मुंढेंची बदली तातडीने रद्द करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले. तुकाराम मुंढे यांची 59 दिवसांतील अन्यायकारक बदलीबाबत जिल्ह्यातील अनेक सामान्य नागरिकांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हे निवेदन पाठविण्यात आले आहे.