या नेत्यांचा सवाल ! तर नागपूर हिवाळी अधिवेशन घेऊ नये
-त्यापेक्षा शेतकऱ्यांना मदत द्या
प्रतिनिधी
अकोला : राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी म्हणतात, यंदा विदर्भातील शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात आहे. कापूस, सोयाबीनसह इतर पिके मातीमोल झाले. त्यातच नागपुरात पुढील महिन्यात अधिवेशन होत आहे. ६०० कोटीच्या जवळपास खर्च होईल. हे अधिवेशन घेऊन होणार खर्च शेतकऱ्यांच्या मदतीसाठी द्यावा, अशी कळकळीची विनंती आपली आहे.
राज्य सरकारने ही बाब गांभीर्याने घ्यावी. त्यांनी शेतावर जाऊन दिवाळीचा काही वेळ घालविला. हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत घेण्यात यावे. नागपुरात अधिवेशन घेण्यात यावे, असा करार आहे. पण, विदर्भातील शेतकऱ्यांची यंदा अत्यंत वाईट परिस्थिती आहे. एका अधिवेशनाचा कोट्यवधी रुपये खर्च येतो. त्याऐवजी तो पैसा कापूस उत्पादक शेतकरी, तूर उत्पादक शेतकरी यांना ते रुपये मदत म्हणून देण्यात यावे. यंदा शेतकरी हवालदील झाला. अमोल मिटकरी म्हणाले, मी एक शेतकरी कुटुंबात जन्माला आलेला माणूस आहे. यंदा शेतकरी संकटात आहे. मुख्यमंत्र्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देत असताना यंदा शेतकऱ्याची दिवाळी अंधारात आहे. यंदासारखे नुकसान राज्याच्या इतिहासात कधी झाले नाही.
-कृषिमंत्री यांनी थोडीतरी शिल्लक असेल तर
शेतकऱ्याच्या घरात आनंद नसेल तर तुमच्या दिवाळीच्या शुभेच्छ्यांना काय अर्थ आहे. अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसा आलेला नाही. सोयाबीन परतीच्या पावसाने सगळे संपवून टाकले. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या तोंडाला पान पुसण्याचे तुम्ही काम करता. हेच का तुमचं हिंदुत्व, असा सवाल अमोल मिटकरी यांनी राज्य सरकारला विचारला. अब्दुल सत्तार कृषिमंत्री आहेत. थोडीतरी शिल्लक असेल, तर बळीराजासाठी दिलासा देणाऱ्या काहीतरी गोष्टी करा, असा सल्ला मिटकरी यांनी दिला.
-सदावर्ते भाजपची कळसुत्री
डुकर, रोही, वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान होते. कुंपनासाठी 80 टक्के अनुदानावर मदत करा. यामुळे शेतीचे नुकसान कमी होईल. शेतकरी आनंदित होईल, असे ही मिटकरी म्हणाले. सदावर्ते यांच्या बोलण्याला गांभीर्याने घेण्याची गरज नाही. सदावर्ते हा भाजपची कळसुत्री आहे. राहुल गांधी यांच्या यात्रेला लाखोचा प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात आता अत्यंत अस्वस्थता माजली आहे. त्यामुळे भाजप सदावर्तेसारख्या लोकांना पुढे करत आहे. सदावर्तेला मी व्यक्ती मानत नाही ती एक प्रवृत्ती आहे.


