मोदींच्या नेत्यांना इलेक्शन टिप्स : या गोष्टी ध्यान्यात ठेवा व सावध राहा

मोदींच्या नेत्यांना इलेक्शन टिप्स : या गोष्टी ध्यान्यात ठेवा व सावध राहा

-दिल्लीत भाजपाच्या मंत्री परिषदेची बैठक

प्रतिनिधी
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (3 मार्च) राजधानी दिल्लीत भाजपच्या मंत्री परिषदेची बैठक झाली. ही बैठक सुमारे ८ तास चालली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बैठकीत पंतप्रधानांनी आपल्या मंत्र्यांना विचारपूर्वक बोलण्याचा सल्ला दिला. तसेच, डीपफेक व्हिडिओ आणि ऑडियोपासून सावध राहण्यासही सांगितले.

या बैठकीत पीएम मोदी सुमारे तासभर बोलले. यावेळी ते म्हणाले की, वादग्रस्त वक्तव्ये टाळा, कोणालाही भेटताना विचारपूर्कव भेटा, विचारपूर्कव बोला. तुम्हाला बोलायचे असेल तर सरकारच्या योजनांवर बोला. सरकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवा. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातही सरकारने केलेल्या विकासकामांचा जनतेसमोर उल्लेख करा, अशा सूचना मोदींनी आपल्या नेत्यांना दिल्या.