महत्वपूर्ण निर्णय : राष्ट्रवादी आमदार अपात्रात प्रकरणी १५ फेब्रुवारी डेडलाइन
-अध्यक्ष नार्वेकरांनी निर्णय घ्यावा
नवी दिल्ली : राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणात सर्वोच्च न्यायालायने आज महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना या प्रकरणात निर्णय देण्यासाठी 15 फेब्रुवारीपर्यंतची मुदत दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मागच्यावर्षी दोन गट पडले. शरद पवार गट आणि अजित पवार गट. शरद पवार एक विरोधी पक्षात आहे, तर अजित पवार गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील बहुतांश आमदारांचा अजित पवार गटाला पाठिंबा आहे.


