भाजपा प्रदेशाध्यक्ष थेट म्हणाले, ७ जागांवर अध्यापही पेच

भाजपा प्रदेशाध्यक्ष थेट म्हणाले, ७ जागांवर अध्यापही पेच

-जागावाटपाबाबत चर्चा अंतिम टप्प्यात

गजानन ढाकुलकर
नागपूर : सहा ते सात जागांवर पेच असून, त्यावर लवकर निर्णय होईल महायुतीमध्ये जागावाटपाबाबत चर्चा अंतिम टप्प्यात असून, येत्या दोन तीन दिवसात चित्र स्पष्ट होईल, असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

ते कोराडी (नागपूर) येथे वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. ते म्हणाले, रामेटक गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेकडे आहे, सध्या रामटेक शिवसेनकडेच आहे. त्यावर लवकरच निर्णय होईल. तर अमरावतीची जागा भाजपाकडे असून १०० टक्के भाजपाच्या चिन्हावर लढू. देशात मोदी प्रधानमंत्री व्हावे यासाठी सर्व प्रयत्न करतील. संभाजीनगर जागेबाबत कोणताही तिढा नाही तर मुंबईच्या जागांबाबत शिंदे निर्णय घेतील. मनसे किंवा इतरांमुळे उमेदवार जाहीर करण्यास वेळ होत नाही, असेही ते म्हणाले.

महायुतीमधील भाजपासह सर्व १३ घटक पक्ष एकत्र निवडणूक लढविणार आहेत. प्रत्येक बुथवर आम्ही लक्ष केंद्रित केले. मोदी सरकारच्या काळात ५० वर्षांत जे मिळाले नाही ते १० वर्षांत मिळाले. या निवडणुकीत मागील भाजपाला सात ते आठ टक्के जादा मते मिळतील. ५१ टक्के मतदान घेऊन महाराष्ट्रात ४५ प्लस जागा महायुतीला मिळतील. पंतप्रधान कोण व्हावे हे जनतेला चांगले कळते असेही ते म्हणाले.

• रक्षा खडसे या सिटिंग खासदार आहेत, १० वर्षे चांगले काम केले.
• प्रतिष्ठेप्रमाणे सर्वांना उमेदवारी मिळेल. सर्वांचा सन्मान ठेवणार
• उदयनराजेच्या उमेदवारीवर महायुतीचे नेते निर्णय घेतील
• पंतप्रधान मोदी यांच्यावर जहरी टीकेला जनता मतातून उत्तर देणार