भाजपाने ठरविलंय : या नव्या चेहऱ्यांना देणार लोकसभेला संधी
-भाजपा हायकमांडशी चर्चा
प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशात काही दिवसातच लोकसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे. सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे. काल दिल्लीत भाजपच्या
या हायकमांडची बैठक झाली, या बैठकीत उमेदवारांबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. भाजप लवकरच आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करणार आहे.
काल झालेल्या बैठकीत काही राज्यातील नेत्यांशी चर्चा करून प्रत्येक जागेवर चर्चा झाली. पहिली बैठक पंतप्रधानांच्या निवासस्थानी दोन तास चालली. सायंकाळी ७ नंतर ही बैठक सुरू झाली. त्यानंतर भाजप मुख्यालयात केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत तब्बल ४ तास मॅरेथॉन बैठक झाली. भाजपच्या मुख्यालयात रात्री ११ ते पहाटे ३ वाजेपर्यंत लोकसभेच्या जागांवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे, यामुळे येणाऱ्या काही दिवसातच लोकसभेच्या उमेदवारांबाबत यादीवर शिक्कामोर्तब होणार आहे.
या दोन्ही बैठकांमध्ये उमेदवार यादीला अंतिम रुप देण्यात आले आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: ही अंतिम यादी केली असल्याचे बोलले जात आहे. भाजप मुख्यालयात बैठक होण्यापूर्वी पंतप्रधान यांच्या निवासस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, जेपी नड्डा यांची एक बैठक झाली. यानंतर भाजप मुख्यालयात केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, भूपेंद्र यादव यांच्यासह अन्य राज्यांतील नेत्यांसोबत बैठक झाली. या बैठकीत उमेदवारांबाबत चर्चा झाली. काही दिवसातच भाजप आपली यादी जाहीर करणार आहे.
–नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार
भाजपने या निवडणुकीत ४०० पारचा नारा दिला आहे. यामुळे देशभरातील नेत्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या टर्मसाठी जोरदार तयारी केली आहे. या निवडणुकीत भाजप नव्या चेहऱ्यांना संधी देणार असल्याचे बोलले जात आहे.


