भाजपाचे मिशन ४०० पार : ८० खासदारांना देणार नारळ
-केंद्रीय निवडणूक समिती ऍक्टिव मोडवर
प्रतिनिधी
नवी दिल्ली : भाजपामध्ये मोठा भूकंप होणार आहे. देशभरातील जवळपास ८० खासदारांना नारळ देण्यात येणार आहे. त्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरविण्याविषयी भाजपचे वरिष्ठ साशंक आहेत. शतप्रतिशत भाजपसाठी पक्षाने कंबर कसली आहे.
अनेक जागांवर सध्याच्या काही खासदारांविषयी तक्रारींचा पाऊस पडल्यानंतर भाजपची केंद्रीय समिती सतर्क झाली आहे. भाजप लोकसभेच्या उमेदवारांची पहिली यादी लवकरच जाहीर करेल. त्यात सध्याच्या मोठ्या चेहऱ्यांसह भाजपसाठी कठीण असलेल्या मतदार संघातील उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे. पण देशभरातील जवळपास 80 खासदारांना तिकीट नाकारण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.


