नागपूर जि.प. त विरोधकांचा धसका अन बंडखोरांचा तडका
– का केली नवनियुक्त अध्यक्षांनी पहिली सभा तहकुब
प्रतिनिधी
नागपूर : नवनिर्वाचित अध्यक्षा मुक्ता कोक्कडे यांच्या अध्यक्षेत जलव्यवस्थापन समितीची पहिली सभा शुक्रवारी(२८ ऑक्टोबर ) आयोजित होती. परंतु, पहिलीच सभा तहकुब करण्याची वेळ त्यांच्यावर आली. ही सभा तहकूब करण्याचे कारण कारण सहलीला सदस्य गेल्याचे असले तरी आगामी निवडणूक बघता भाजप विरोधकांचा धसका व बंडखोरांच्या हालचालीमुळे ही सभा घेण्यात आली नसल्याचे कारण पुढे येत आहे.
जि.प.च्या नवीन अध्यक्षपदी मुक्ता कोकड्डे यांची तर उपाध्यक्षपदी कुंदा राऊत यांची वर्णी लागली आहे. तर येत्या १ नोव्हेंबरला चार विषय समिती सभापती पदासाठी निवडणूक होऊ घातली आहे. अध्यक्षा या स्थायी समिती आणि जलव्यवस्थापन समितीच्या पदसिद्ध अध्यक्ष असतात. त्यामुळे नवीन अध्यक्षांकडे येणाऱ्या जलव्यवस्थापन समितीची शुक्रवारला पहिली सभा आयोजित करण्यात आली होती. परंतु, सभापती निवडणुकीमध्ये अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीप्रमाणे कॉंग्रेसमध्ये बंडखोरी होऊ नये याची खबरदारी घेत सत्तापक्षातील जवळपास सर्वच सदस्यांना सहलीवर पाठविण्यात आले आहे. यात त्यांचाही समावेश आहे. त्यामुळे ही सभा तहकुब करावी लागली. सभा तहकुब करण्यात आल्याचे संदेश मोबाईलवर यथाशि ग्र समितीच्या सदस्यांना पाठविण्यात आले होते.


