नागपुरात या नेत्याचा दावा: भाजपा- सेनेचे २०० आमदार निवडून येईल

नागपुरात या नेत्याचा दावा: भाजपा- सेनेचे २०० आमदार निवडून येईल

-हे जनतेचे सरकार असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांचे मत

प्रतिनिधी
नागपूर : राज्यात आमच्याकडे 164 चे संख्याबळ आहे. तर 2024 मध्ये शिवसेना- भाजप युतीचे 200 पेक्षा आमदार असतील असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. शिंदेंसारखा मुख्यमंत्री राज्यातील जनतेने पहिल्यांदा पाहिला आहे, असे म्हणत हे जनतेचे सरकार असल्याचा बावनकुळे यांनी म्हटले आहे.

वेळकाढूपणा नव्हे तर रस्त्यावर सही करणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रुपाने भेटला आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. तर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या समन्वयाने, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही 164 आहोत पण 2024 मध्ये 200 प्लस आमदार निवडूनप आणू असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

मविआच्या अडीच वर्षांच्या काळात उद्धव ठाकरे यांच्या खिशात पेनही नव्हता. पण आताचे मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस हे जिथे भेटतील तेथील जनतेचे समाधान करतात. एकनाथ शिंदे यांच्या सारखा मुख्यमंत्री महाराष्ट्राने प्रथमच पाहिला आहे. बाजार समितीमध्येही सध्या पक्षीय राजकारण नाही, असेही ते म्हणाले.

सहकार खात्यात याची आघाडी त्याची आघाडी असते. कब्जा वैगेरे काही नसते. स्थानिक पातळीवर राजकारण नको. सत्ता गेली पन्नास – पन्नास लोक निघून गेले, संघटना हातून जात आहे मात्र अजूनही सत्तेचा बाणा जात नाही. उद्धव ठाकरे यांना एका भुमिकेवर थांबता येत नाही. ते सत्तेत होते तेव्हा वेगळे मत होते, आता विरोधक आहेत तेव्हा मतं बदलली, असा टोलाही बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.