नागपुरात उद्धव ठाकरे: उद्या अधिवेशन दणाणून सोडू

नागपुरात उद्धव ठाकरे: उद्या अधिवेशन दणाणून सोडू

-या नेत्याचा स्पष्ट इशारा

प्रतिनिधी
नागपूर: शिवसेना केव्हाही शांत नसते ती आक्रमक राहते. त्यामुळे उद्या शिवसेना आक्रमक राहील, आक्रमकपणे राज्यातील प्रश्न सोडवेल, असे रोखठोक प्रतिपादन विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना केले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नागपुरात आगमन झाल्यानंतर हॉटेल रेडिसन ब्ल्यूमध्ये आमदारांची बैठक घेतली. बैठकीत चहापानाबरोबरच अनौपचारीक चर्चा झाली. आज आघाडीची बैठक होणार होती. पण आजची ही बैठक उद्यावर ठेवली आहे. बैठकीत काय चर्चा झाली असे पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की आम्ही सीमाप्रश्न,महापुरुषांचा अवमान, शेतकऱ्यांच्या इतर समस्यावर उद्या मुद्दे मांडणार आहे.

मिंदे सरकारला घेणार आहोत. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशवन नागपुरात होत असताना विदर्भाचा अनुशेष वाढत आहे. याकडे सरकारचे लक्ष वेधणार आहे.२०१४ पासून भाजप सरकारमध्ये आहे. तेव्हापासून विदर्भाचा काय विकास केला ते सांगावे, भाजपने वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे काम केले आहे. महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला पळविले, अशा सरकारला बोलण्याचा अधिकार नाही, असे दानवे म्हणाले.