दुपारी १२ वाजता सुरुवात : १७० एकरावर सभा : ११०० एकरांत पार्किंग

दुपारी १२ वाजता सुरुवात : १७० एकरावर सभा : ११०० एकरांत पार्किंग

-अंतरवली सराटी गावात भगवे वादळ

प्रतिनिधी
बीड : जालन्यातील अंतरवली सराटी गावात भगव वादळ आलं आहे. अंतरवली सराटीत काल रात्रीपासूनच हजारो लोक एकवटले आहेत. दीडशे एकर मैदानावर बघावं तिकडे गर्दीच गर्दी दिसत आहे. आरक्षणासाठी मराठा समाजातील लोक या मैदानात एकवटले असून आरक्षणाबाबत सर्वांच्या भावना तीव्र आहेत. सभेला आलेले लोक आरक्षणाबाबत पोटतिडकीने भूमिका मांडत आहेत. तर, मनोज जरांगे पाटील आज काय बोलतात याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. जरांगे पाटील यांनी सभेला जाण्यापूर्वी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारला आरक्षणाच्या मुद्द्यावरून सूचक इशारा दिला आहे. त्यामुळे जरांगे पाटील सभेत काय बोलणार याचे संकेतच मिळत आहेत.

अंतरवली सराटीत जनप्रलयच आला आहे. मराठा समाज शांततेत आला आहे आणि शांतेत जाईल. आज दुपारी 12 वाजता सभेला सुरुवात होईल. देशाला आणि राज्याला मराठा समाज शांततेचा संदेश देणार आहे. आजपासून सरकारच्या हातात दहा दिवस आहेत. आम्हाला हक्काचं आरक्षण पाहिजे. ते सरकारला द्यावंच लागेल. सरकारने भावना शून्य होई नये, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे.

ही गर्दी नाहीये. हा जमाव नाहीये. ही सभाही नाहीये. ही वेदना आहे. एका वेदनेतून लोक या ठिकाणी आले आहेत. स्वत:च्या लेकराचं भविष्य आणि अस्तित्व धोक्यात आलं आहे. एक टक्का हुकला तरी सुशिक्षित बेकार म्हणून मराठा तरुणाला घरात बसावं लागतंय. मग तो कितीही हुशार असला तरी त्याची संधी जाते. संधीच मिळत नसल्याने त्याचा नोकरीतील टक्का कमी झाला आहे. म्हणून मी सामान्य माणसाची लढाई लढत आहे. आजपासून दहा दिवस हातात आहे. दहा दिवसात आरक्षण द्यायचं आहे. हा सुवर्ण क्षण आहे. या क्षणाला साक्षीदार व्हायचं आहे. एकही मराठा घरी राहणार नाही. पण सरकारने भावना शून्य होऊ नये. त्यांनी दहा दिवसात आरक्षण द्यावं, असं आवाहन जरांगे पाटील यांनी केलंय.

आजच्या सभेत मी सर्व उलगडा करणार आहे. वस्तुस्थिती मांडणार आहे. समाज मायबाप आहेत. आम्ही 1100 एकरवर पार्किंगची सोय केलीय. 170 एकर जागेवर सभा होत आहे. गैरसोय झाली तरी समाज नाराज होणार नाही. आमची वेदना एकच आहे. मुलांचं भविष्य अडचणीत येऊ नये, असंही त्यांनी सांगितलं.

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगे पाटील यांच्यावर टीका केली. या दोघांचाही जरांगे पाटील यांनी समाचार घेतला. दोन्ही एकाच बाजारातील आहेत. सदावर्ते आणि भुजबळ ते काय आहेत हे सर्वांना माहीत आहे. भुजबळांचा विषय चिल्लर झालाय. कुठेही काहीही बोलतात