दिलासा नाही : नवाब मालिकांची सुनावणी 6 जानेवारीला

  • दिलासा नाही : नवाब मालिकांची सुनावणी 6 जानेवारीला

-काय म्हटले कोर्टाने

प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी झाली. मुंबई सत्र न्यायालयाने कथित गैरव्यवहार प्रकरणी जामीन फेटाळला होता. यानंतर मुंबई उच्च न्यायालयात ही सुनावणी झाली. नवाब मलिकांची सुनावणी पुढे ढकलली आहे. ती 6 जानेवारीला होणार आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नोव्हेंबर 2021 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिकांवर गंभीर आरोप लावले होते. ते म्हणाले होते की, मलिकांच्या कंपनीने अशा लोकांकडून जमीन खरेदी केली आहे. जे 1993 च्या मुंबई ब्लास्टमध्ये आरोपी आहेत. ही जमीन दाऊद इब्राहिमशी संबंधीत आहे. तसेच नवाब मलिकचे अंडरवर्ल्डशी संबंध असून दिवाळीनंतर बॉम्बस्फोट करणार असल्याचे फडणवीस यांनी म्हटले होते.

दोन नावांनी लटकविले

देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दोन नावे दिली होती. त्यात सरदार शाह वली खान आणि मोहम्मद सलीम पटेल यांचा उल्लेख होता. फडणवीस म्हणाले होते की, सरदार शाह वली खान हा 1993 च्या बॉम्बस्फोटातील गुन्हेगार आहेत, ज्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. तो टायगर मेमनचा साथीदार होता, तसेच बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज, मुंबई महापालिकेत बॉम्ब कुठे ठेवायचा याची रेकी त्यांने केली होती. त्यानेच टायगर मेमनच्या वाहनात आरडीएक्स लोड केले होते.

दुसरी व्यक्ती मोहम्मद सलीम पटेल आहे, जो दाऊद इब्राहिमचा माणूस होता. फडणवीस यांनी तो हसीना पारकरचा ड्रायव्हर, बॉडीगार्ड असल्याचे सांगितले होते.

फडणवीस म्हणाले होते की, ‘2007 मध्ये हसिना पारकरला अटक झाली तेव्हा सलीम पटेला देखील अटक करण्यात आली होती. दाऊद फरार झाल्यानंतर हसीनाच्या नावावर संपत्ती जमा झाल्याचे रेकॉर्डवरून समोर आले आहे. यात सलीमची महत्त्वाची भूमिका होती. संपत्तीची पावर अटॉर्नी त्याच्या नावावर घेतली जात होती. हा सलीम पटेल हसिनाच्या सर्व बिझनेसचा प्रमुख होता.

-ही कारवाई झाली होती

-मलिकांची ही संपत्ती ईडीकडून जप्त

-कुर्ल्यातील गोवावाला कंम्पाऊंड जप्त

-कुर्ला पश्चिमेतील व्यावसायिक जागा ईडीकडून जप्त

-उस्मानाबादमधील मलिकांची 148 एकर जमीन जप्त

-कुर्ला पश्चिमेतील 3 फ्लॅट्स जप्त

वांद्रे पश्चिमेतील 2 राहती घरंही ईडीकडून जप्त

ईडीच्या माहितीनुसार, मलिकांची जवळपास 11 कोटी 70 लाख रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. मलिकांची सॉरीडोस नावाची कंपनी आहे. मलिक इन्फ्रास्ट्रकचरच्या माध्यमातून पैसे देण्यात आले होते. ईडीने चौकशी केली असता संबंधित संपत्ती आणि पैशांचा संबंध हा दाऊदशी संबंधित व्यक्तींसोबत येतोय. तिथून हे सगळे पैसे आले असून त्यातून ही संपत्ती घेतली गेल्याचा दावा आणि आरोप ईडीने केला आहे. मरियम गोवाला नावाच्या महिलेची संपत्ती हडप केल्याचा आरोप करण्यात आला आहे.